-
New Governor Acharya Devvrat : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल ‘आचार्य देवव्रत’ यांचा शपथविधी सोहळा राजभवनात नुकताच पार पडला आहे. राज्यपालपदाची शपथ महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या हस्ते देण्यात आली.
-
या शपथविधी सोहळ्याला राज्यातील मान्यवर, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
-
दरम्यान, काही दिवसांआधी राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती झाले आहेत, त्यानंतर त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर राज्याचे पुढचे राज्यपाल कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं.
-
यानंतर गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले आचार्य देवव्रत यांचं नाव समोर आलं आणि त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं.
-
दरम्यान, कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत याबद्दल जाणून घेऊयात.
-
आचार्य देवव्रत यांचा जन्म हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील समलखा इथला आहे.
-
ते राजकारणी, शिक्षणतज्ञही राहिले आहेत. त्यांनी कुरुक्षेत्र मधील गुरुकुलाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे.
-
२०१९ पासून ते गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी २०१५ ते २०१९ हिमाचल प्रदेशचेही राज्यपाल राहिले आहे. तिथे त्यांनी ४ वर्षे कारभार पाहिला.
-
(सर्व फोटो सोशल मीडिया) हेही पाहा- आशिया चषकामध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याबाबत भारतच किंग! पाकिस्तान कितव्या स्थानी? पाहा टॉप ५ मध्ये कोणते देश?

“कालच्या सामन्यातून पाकिस्तानला हजारो कोटी दिले”, राऊतांचा मोठा दावा; गावसकरांच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हणाले…