-
कोलकातामध्ये मंगळवारी रात्री कोसळलेला मुसळधार पाऊस गेल्या चार दशकातील सर्वाधिक पाऊस असल्याचे समोर आले आहे. यामुळे वीज पडून किमान आठ जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली, शैक्षणिक संस्था बंद कराव्या लागल्या आणि राज्य सरकारने दोन दिवस आधीच पूजा सुट्ट्या जाहीर केल्या.
-
दुर्गा पूजा उत्सवापूर्वी पावसाच्या पाण्याने मंडप पाण्याखाली गेले असल्याने, देवीच्या मूर्ती थोड्या उंचीवर ठेवण्यात आल्या होत्या. (पीटीआय)
-
कोलकातामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. (पीटीआय)
-
कोलकाता सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. पूरामुळे बाजारपेठीतील दुकानेही पाण्याखाली गेली आहेत. एका दुकानदाराने खराब झालेला माल रस्त्यावर फेकला. (पीटीआय)
-
रात्रभर पडलेल्या पावसानंतर पाणी साचलेल्या भागातून एक माणूस हाताने रिक्षा ओढत आहे. (पीटीआय)
-
पावसामुळे कॉलेज स्ट्रीटवर पाणी साचले असताना लोक पुस्तकांच्या दुकानाजवळ उभे आहेत. (पीटीआय)
-
शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहने जात आहेत. (पीटीआय)
-
दुर्गापूजेच्या तयारीदरम्यान दुकानांमध्ये पाणी शिरल्यानंतर दुकानदारांनी आपला माल वाचविण्याची धडपड केली. (पीटीआय)

Asia Cup Final: भारत-पाकिस्तान फायनलसाठी कसं आहे समीकरण? पाक संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर