-
बिहारच्या सुप्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर या अलीकडेच काही भाजपा नेत्यांना भेटल्या, त्यानंतर त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
सोशल मीडियावर आणि स्थानिक माध्यमांमध्ये या भेटीची चर्चा रंगली असून, त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळू शकते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
-
मैथिली ठाकूर यांनी मात्र स्पष्ट केलं की, “मी कोणत्याही राजकीय पक्षात अधिकृतरित्या सामील झालेली नाही”, पण देशाच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
-
मैथिली ठाकूर या मिथिला प्रदेशातील पारंपरिक गाण्यांसाठी आणि भक्तिगीतांसाठी प्रसिद्ध आहेत.
-
त्यांच्या गायकीमुळे त्या संपूर्ण देशात लोकप्रिय झाल्या असून, तरुण पिढीमध्येही त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
-
मैथिली ठाकूर यांना “Culture Ambassador of the Year” हा पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून मिळाला आहे
-
बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलावंतांचा राजकारणात प्रवेश हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.
-
काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे की, मैथिली ठाकूर यांचा स्वच्छ आणि सांस्कृतिक प्रतिमा असलेला चेहरा पक्षासाठी आकर्षक ठरू शकतो.
-
मैथिली ठाकूर यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्यांनी “ही फक्त स्नेहभेट होती” असं सांगितलं असलं, तरी राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मैथिली ठाकूर/इन्स्टाग्राम)

Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”