-
युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान कीर स्टार्मर गुरुवारी त्यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत होते. यावेळी पंतप्रधान मोदी आणि स्टार्मर यांची महाराष्ट्र राजभवन येथे भेट झाली. भारत आणि यूकेने मुक्त व्यापार करार (एफटीए) वर स्वाक्षरी केल्यानंतर काही महिन्यांनीच यूकेच्या पंतप्रधानांचा हा दौरा होत आहे, ज्याचा उद्देश द्विपक्षीय व्यापार दरवर्षी २५.५ अब्ज पौंडांपर्यंत वाढवणे आहे. (फोटो -X/@narendramodi)
-
भारत-ब्रिटनदरम्यानच्या व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील परस्पर भागीदारीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे कीर स्टार्मर यांची आज भेट झाली. स्टार्मर बुधवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते, पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर स्टार्मर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. (फोटो -X/@narendramodi)
-
स्टारमर बुधवारी मुंबईत आले आणि त्यांनी वरिष्ठ व्यावसायिकांची भेट घेतली. तसेच त्यांनी यशराज फिल्म्स स्टुडिओला भेट दिली. गुरुवारी सकाळी त्यांनी मुंबईतील राजभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, जिथे दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या भविष्यावर चर्चा केली. (फोटो -X/@narendramodi)
-
स्टार्मर बुधवारी मुंबईत आले आणि त्यांनी व्यावसायिकांची भेट घेतली. तसेच त्यांनी यशराज फिल्म्स स्टुडिओला भेट दिली. गुरुवारी सकाळी त्यांनी मुंबईतील राजभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली , जिथे दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या भविष्यावर चर्चा केली. (फोटो -X/@narendramodi)
-
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली. गोयल यांनी एक्स वर पोस्ट केले की दोन्ही नेत्यांनी परस्पर विकास आणि समृद्धी साधण्यासाठी भारत-ब्रिटन व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. (फोटो -X/@narendramodi)
-
आज (गुरूवार) जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित सहाव्या जागतिक फिनटेक परिषदेत दोन्ही पंतप्रधानांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवात विविध क्षेत्रांतील ७५ देशांतील एक लाखांहून अधिक मान्यवर सहभागी झाले होते, ही जगातील सर्वात मोठी आर्थिक तंत्रज्ञानविषयक परिषद ठरली आहे. (फोटो -X/@narendramodi)
-
मोदी व स्टार्मर या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर दोघांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं, ज्यामध्ये स्टार्मर यांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत व ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. उभय देशांमधील भागीदारी ही जागतिक स्थिरता व आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचा आधार बनली आहे.” (फोटो -X/@narendramodi)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “पंतप्रधान स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली भारत व ब्रिटनच्या संबंधांमध्ये उल्लेखनीय अशी प्रगती झाली आहे. यावर्षी जुलै महिन्यात मी ब्रिटनच्या दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा आम्ही ऐतिहासिक अशा व्यापक आर्थिक व व्यापार करारावर (CETA) स्वाक्षरी केली. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या आयातीवरील खर्च कमी होईल. उभय देशांमधील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील, व्यापार वाढेल आणि यातून आपल्या उद्योगांना व ग्राहकांना फायदा होईल.” (फोटो -X/@narendramodi)
-
“माझे मित्र पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे मुंबईतील राजभवन येथे स्वागत करताना खूप आनंद झाला. त्यांचा हा भारताचा पहिलाच दौरा असल्याने तो निश्चितच एक विशेष प्रसंग आहे. भारतामध्ये आलेले सर्वात मोठे व्यावसायिक शिष्टमंडळ बरोबर असल्यामुळे ही भेट आणखीनच विशेष ठरलू असून यातून भारत आणि यूके यांच्यातील संबंधांची मजबूत उदाहरण दाखवून देते,” असे कॅप्शन देत पंतप्रधान मोदींनी स्टार्मर यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो -X/@narendramodi)

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बूट फेकण्याच्या घटनेवर अखेर मौन सोडलं; म्हणाले, “त्या घटनेमुळं…”