-
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. तिकीट वाटपावरून नाराज होऊन पक्षाच्या मागासवर्गीय सेलमधील ५० नेत्यांनी राजीनामा दिला. तिकिट वाटपात पक्षपात केल्याचा आरोप या संतप्त नेत्यांनी केला आहे.
-
राजीनामा देणाऱ्यांमध्ये भोला साहनी (राज्य सरचिटणीस), कुमार गौरव (राज्य उपाध्यक्ष), गोपाल लाल देव (मुख्य सरचिटणीस), श्याम सुंदर कामत (जिल्हा सरचिटणीस), सुशील साहनी (राज्य सचिव) आणि अनेक जिल्हा आणि विभाग स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
-
पक्ष सोडलेल्या नेत्यांनी आरोप केला की, अत्यंत मागासलेला समुदाय वर्षानुवर्षे राजदसाठी झटत आहे, परंतु तिकीट वाटपाच्या वेळी या वर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे.
-
राजदच्या मागासवर्गीय वर्ग सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कुमार गौरव यांनी पक्षावर टीका करताना म्हटले की, पक्षाकडे आता कोणतीही विचारसरणी उरलेली नाही. ते आता फक्त खुशामत आणि पैशाच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करतात. आमच्या समुदायाकडे दुर्लक्ष करून, पक्षाने हे सिद्ध केले आहे की, हा काही निवडक लोकांचा पक्ष बनला आहे.
-
त्यांनी सांगितले की ते आणि त्यांचे सहकारी आता अपमान सहन करणार नाहीत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राजद नेते भोला साहनी म्हणाले की, प्रामाणिक पक्ष कार्यकर्त्यांचे सतत मनोधैर्य खचवले जात आहे. प्रत्येक वेळी, मागास समुदाय केवळ व्होट बँक मानला जातो, परंतु जेव्हा सहभागाचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना बाजूला केले जाते.
-
त्यांनी सांगितले की राजीनामा देणाऱ्यांमध्ये जिल्हा सेल अध्यक्ष, अनेक विभाग अध्यक्ष आणि पंचायत स्तरावरील कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
-
या असंतोषाचा थेट पक्षाच्या निवडणूक कामगिरीवर परिणाम होईल असा इशाराही नेत्यांनी दिला. जर नेतृत्वाने कार्यकर्त्यांच्या आवाजाकडे लक्ष दिले नाही तर येत्या निवडणुकीत राजदला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
-
बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचा आरजेडी पक्ष तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसशी आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवत आहे. दरम्यान, राजेडी आणि काँग्रेसमध्येही जागावाटपावरून सध्या रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्याशी चर्चेसाठी पाठवले आहे. (All Photo: RJD/X)

बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल