-
बिहारच्या पश्चिम चंपारणमधील लौरिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे विकासशील इंसान पक्षाचे (व्हीआयपी) उमेदवार रण कौशल प्रताप सिंह उर्फ गुड्डू सिंह यांनी ३७३ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे, ज्यामुळे ते बिहार निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक बनले आहेत.
-
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, बिल्डर आणि रिअल इस्टेट उद्योजक असलेल्या सिंह यांनी २.५८ कोटी रुपयांची शेती जमीन, ३५२ कोटी रुपयांची बिगर शेती जमीन आणि ५.५१ कोटी रुपयांचे शेअर्स आणि सिक्युरिटीज असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची पत्नी सलोनी सिंह यांच्याकडे १३१ कोटी रुपयांची मालमत्ता आणि ६.५९ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
-
रण कौशल प्रताप सिंह यांच्या कुटुंबियांकडे सात आलिशान गाड्या आहेत. घरातील दागिन्यांमध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलींच्या मालकीचे सुमारे ३.४ किलो सोने आहे, तर सिंह यांच्याकडे स्वतः ६०० ग्रॅम सोने आणि हिऱ्यांचे दागिने आहेत.
-
सिंह आणि त्यांच्या पत्नीकडे परदेशी बनावटीची बंदुका देखील आहेत.
-
सिंह यांनी पहिल्यांदा २०१५ मध्ये आरजेडीच्या तिकिटावर लौरिया येथून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांची मालमत्ता ८ कोटी रुपयांची होती.
-
२०१५ मध्ये त्यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि १३ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती.
-
सिंह यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावावर सुमारे १४.४६ कोटी रुपयांचे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर १.१२ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही नमूद केले आहे.
-
नरकटियागंज विधानसभा मतदारसंघातील राजद उमेदवार दीपक यादव हे पश्चिम चंपारण जिल्ह्यातील आणखी एक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी ८० कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. (All Photos: Ran Kaushal Pratap Singh/Social Media)
बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल