-
बंगालच्या उपसागरातून पुढे सरकल्यानंत मंगळवारी संध्याकाळी मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले. (Source: Photo by PTI)
-
मोंथा चक्रीवादळाने किनारपट्टी ओलांडल्यानंतर काकीनाडा, विशाखापट्टणम, कृष्णा आणि पश्चिम गोदावरी या जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आणि १०० किमी/ताशी वेगाने वारे वाहू लागले. (Source: Photo by PTI)
-
वादळात जीवितहानी टाळण्यासाठी शाळा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्ता बंद करण्यात आली होती. अनेक किनारी मंडळांमध्ये वाहनांच्या हालचालीवर बंदी घालण्यात आली. (Source: Photo by PTI)
-
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) अनेक किनारी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला. ज्यामध्ये दुर्गम भागात २० सेमी पेक्षा जास्त अतिवृष्टीचा अंदाज आहे. (Source: Photo by PTI)
-
भूस्खलन होण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांची व्यवस्था मदत शिबिरांमध्ये करण्यात आली आणि आपत्ती प्रतिसाद पथके तैनात केली. (Source: Photo by PTI)
-
आंध्र प्रदेश सरकारने किनारी मंडळांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये नियंत्रण कक्ष २४/७ कार्यरत राहण्याचे आणि अत्यावश्यक सेवा अखंडित राहण्याचे निर्देश देण्यात आले. (Source: Photo by PTI)
-
आंध्र प्रदेशातील त्रिभुज परिसरातील उभ्या भात आणि बागायती पिकांचे वादळाने नुकसान केले. ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली आहेत. (Source: Photo by PTI)
-
केंद्र आणि राज्य सरकारने बाधित समुदायांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह अनेक मदत आणि बचाव पथके पाठवली. (Source: Photo by PTI)
-
मोंथाच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उन्मळून पडलेले पामराचे झाड दिसत आहे. कोनासीमा जिल्ह्यात झाड कोसळल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. (Source: Photo by PTI)
-
मोंथा चक्रीवादळामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये शिजवलेले जेवण, पिण्याचे पाणी आणि आवश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. (Source: Photo by PTI)
IND vs AUS 1st T20 Live Score: भारत-ऑस्ट्रेलिया कॅनबेरातील पहिला टी-२० सामना रद्द, सूर्या-गिलने रचली होती उत्कृष्ट भागीदारी