-
वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांचे काल रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. (छायाः प्रदीप दास)
-
विलास जोशी यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. (छायाः प्रदीप दास)
-
न सांगता घेतलेल्या रजेची नोंद पोलीस ठाण्यातील डायरीत केल्याने संतापलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी व त्यांचे ऑर्डर्ली बाळासाहेब अहेर यांच्यावर गोळ्या झाडून नंतर आत्महत्या केली होती. (छायाः प्रदीप दास)
-
दिलीप शिर्के त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये मनमिळावू म्हणून परिचित होते. त्यांना अन्याय सहन होत नव्हता, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.(छायाः प्रदीप दास)
-
सोनसाखळी चोरांचे कर्दनकाळ म्हणून शिर्के ओळखले जायचे असे त्यांच्या मित्राने सांगितले.(छायाः प्रदीप दास)
-
पोलीस आयुक्त राकेश मारिया हेदेखील विलास जोशी यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित होते. (छायाः प्रदीप दास)
-
विलास जोशी हे अत्यंत कुटुंबवत्सल होते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घरी जाण्यापूर्वी त्यांनी पत्नीला फोन केला. जेवायला थांब मी थोडय़ा वेळाने घरी पोहोचेन एकत्र जेऊ असे त्यांनी पत्नीला सांगितले. हाच त्यांचा शेवटचा फोन ठरला. त्यांनतर ही दुर्देवी घटना घडली. (छायाः प्रदीप दास)
-
जेव्हा त्यांना गोळी लागली तेव्हाही ते शांत होते. रुग्णालयातही शेवटपर्यंत बोलत होते. मृत्यूच्या दारात आलोय याची त्यांना कल्पना होती, पण तरी त्यांनी धीर सोडला नव्हता, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. (छायाः प्रदीप दास)
-
वरिष्ठांचा निरोप समारंभ होतो. पण खालच्या कर्मचाऱ्यांचा का नाही, म्हणून शिर्के यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. (छायाः प्रदीप दास)
-
जोशी यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्यादरम्यानत त्यांचा मृत्यू झाला. (छायाः प्रदीप दास)
-
(छायाः प्रदीप दास)
-
वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांचे काल रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. (छायाः प्रदीप दास)
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल