-
तब्बल१३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिट अँड रन खटल्यात सत्र न्यायालयाने बुधवारी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवले. घरातून न्यायालयात रवाना होण्यापूर्वी टिपलेले सलमानचे छायाचित्र. (छाया – वसंत प्रभू)
-
न्यायालयात सलमानला वाचविण्यासाठी खोटी साक्ष देणारा चालक अशोक सिंग याच्याबरोबरच सलमान खान न्यायालयात दाखल झाला. (छाया- वसंत प्रभू)
-
न्यायालयात सलमानला वाचविण्यासाठी खोटी साक्ष देणारा चालक अशोक सिंग याच्याबरोबरच सलमान खान न्यायालयात दाखल झाला. (छाया- वसंत प्रभू)

सलमान खानचा भाऊ अरबाज खान न्यायालयात आला तेव्हाचे छायाचित्र.(छाया- वसंत प्रभू) -
न्यायाधीशांनी सलमान दोषी असल्याचा निकाल देत पाच वर्षांची शिक्षा सुनाविल्यानंतर पडद्यावरचा अॅक्शन हिरो भावुक झालेला पहायला मिळाला. (छाया- वसंत प्रभू)
-
या सुनावणीसाठी सलमानची बहीण अर्पिता, बंधू सोहेल आणि अरबाज खान न्यायालयात उपस्थित होते. खान कुटुंबातील सर्व सदस्य सुनावणी कक्षातील मागील बाजूस बसून प्रार्थना करताना दिसत होते. (छाया- वसंत प्रभू)
-
सलमान खान कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर न्यायालयाकडे रवाना झाला. (छाया- वसंत प्रभू)
-
सलमानचा भाऊ सोहेल खान मुंबईतील सत्र न्यायालयात आला तेव्हाचे छायाचित्र. (छाया- वसंत प्रभू)
-
सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर निराश झालेला सोहेल खान. (छाया- वसंत प्रभू)
-
निकालानंतर सलमान खान भावूक झालेला दिसला. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी सलमानला धीर देण्याचा प्रयत्न केला. सलमानचे वकील शिक्षा सौम्य करण्यासाठी युक्तिवाद करतानाच सलमानचे डोळे भरून येत होते. (छाया- वसंत प्रभू)
-
हिट अँड रन खटल्याच्या निकालाच्या आदल्या दिवशी सलमानची बहीण अर्पिता आणि तिचा नवरा सलमानच्या निवासस्थानी दाखल झाले होते. (छाया- वसंत प्रभू)
-
हिट अँड रन खटल्याच्या निकालाच्या आदल्या दिवशी बॉलीवूड किंग शाहरूख खानने सलमानची भेट घेतली. (छाया- वसंत प्रभू)
-
यावेळी शाहरूख आणि सलमान यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. (छाया- वसंत प्रभू)
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस