-
पंतप्रधान नरेंद्र यांनी सत्तेत आल्यापासून ११ महिन्यांमध्ये १९ देशांना भेटी दिल्या. गेल्या ३६५ दिवसांपैकी ५६ दिवस ते देशाबाहेर राहीले.
-
पंतप्रधानांचा हा पहिला परदेश दौरा होता. त्यासाठी भूतानसारखा शेजारी देश निवडून मोदींनी दक्षिण आशियाई क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
-
ब्राझीलमधील फोर्तालेझा शहरात ‘ब्रिक्स’ संघटनेची सहावी शिखर परिषद झाली. या परिषदेत सदस्य देशांनी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी या आर्थिक संघटनांशी बरोबरी करू शकेल अशा ‘न्यू डेव्हलपमेंट बँक’ स्थापनेवर चर्चा केली. मात्र मोदी या बँकेचे मुख्यालय नवी दिल्लीत आणण्यात अपयशी ठरले.
-
नेपाळमधील जनआंदोलनानंतर तेथे रुजत चाललेल्या लोकशाही प्रक्रियेनंतर नेपाळी संसदेला संबोधित करणारे मोदी पहिले परदेशी नेते बनले. याकडे दोन्ही देशांच्या संबंधातील महत्त्वाचा बदल म्हणून पाहिले गेले. याशिवाय जलविद्युत प्रकल्प आणि अन्य विषयांवरही संबंधांना उजाळा मिळाला.
-
या भेटीत नागरी अणुकराराविषयी काही प्रलंबित मुद्दय़ांवर चर्चा झाली. तसेच जपानकडून भारतीय नौदलासाठी ‘यूएस-२’ या प्रकारची जमिनीवर व पाण्यातही उतरू शकणारी विमाने घेण्यावरही सकारात्मक चर्चा झाली.
-
संयुक्त राष्ट्रांच्या ६९व्या आमसभेला उद्देशून केलेल्या भाषणात मोदींनी भारताला सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळण्याची मागणी, दहशतवाद, पाकिस्तानकडून काश्मीर प्रश्नाचे केले जाणारे आंतरराष्ट्रीयीकरण, पर्यावरणरक्षण आदी विषयांचा समाचार घेतला.
-
जगप्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित कार्यक्रमाला सुमारे २० हजारापेंक्षा जास्त भारतीय वंशाचे नागरिक उपस्थित होते. याशिवाय जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथेही हजारो लोकांनी मोठ्या स्क्रीन्सवर मोदींचे भाषण ऐकण्यासाठी एकच गर्दी केली होती. मोदींच्या स्वागतासाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
-
भारत-म्यानमार-थायलंड यांना जोडणारा महामार्ग बांधणे, म्यानमारमध्ये थेट विमान सेवा सुरू करणे, तेथील विकास प्रकल्पांत भागीदारी करणे अशा विषयांवर चर्चा झाली.
-
मोदींनी पूर्व आशियाई देशांच्या शिखर परिषदेत १८ जागतिक नेत्यांसमोर धर्म व दहशतवाद यांची सांगड न घालण्याचं आवाहन केलं. दक्षिण चीन समुद्रात शांतता अन् स्थिरतेसाठी आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करणं गरजेचं असल्याचं सांगून चीनला चिमटा काढला. खेरीज त्यांनी ‘सायबर’ नि ‘अवकाश’ यांना युद्धभूमी न बनविण्याची भूमिका स्पष्टरीत्या मांडली.
-
आशियाई देशांतील परस्पर सहकार्यावर भर देण्यात आला.
-
इंदिरा गांधी यांच्यानंतर ३३ वर्षांनी फिजीला भेट देणारे मोदी पहिलेच भारतीय नेते बनले.आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात फिजीचे स्थान महत्त्वाचे आहे.
-
ऑस्ट्रेलिया हा अणुइंधन पुरवठादार देशांच्या संघटनेतील महत्त्वाचा देश आहे आणि त्याच्याकडून भारताने अणुभट्टय़ांसाठी अणुइंधन घेण्यासाठी चर्चा केली.
-
ब्रिस्बेनमध्ये ‘जी २० परिषदे’तील सर्व राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचा आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. काळा पैशांच्या मुद्यावर सर्व राष्ट्रांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
-
मोदींच्या सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंका हे देश हिंदी महासागरात मोक्याच्या ठिकाणी वसले आहेत आणि तेथे चीन आपला प्रभाव वाढवू पाहत आहे. चीनच्या त्या प्रयत्नांना काटशह देणे आणि भारताचा तेथील प्रभाव वाढवणे यासाठी या भेटींना महत्त्व होते. तसेच श्रीलंकेतील राजपक्षे यांचे चीनधार्जिणे सरकार जाऊन मैत्रिपाल सिरिसेना यांचे नवे सरकार आल्यानंतर तेथे भारतीय हितसंबंधांना पुनरुज्जीवित करणे यासाठी ही भेट मोलाची होती.
-
मोदींच्या सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंका हे देश हिंदी महासागरात मोक्याच्या ठिकाणी वसले आहेत आणि तेथे चीन आपला प्रभाव वाढवू पाहत आहे. चीनच्या त्या प्रयत्नांना काटशह देणे आणि भारताचा तेथील प्रभाव वाढवणे यासाठी या भेटींना महत्त्व होते. तसेच श्रीलंकेतील राजपक्षे यांचे चीनधार्जिणे सरकार जाऊन मैत्रिपाल सिरिसेना यांचे नवे सरकार आल्यानंतर तेथे भारतीय हितसंबंधांना पुनरुज्जीवित करणे यासाठी ही भेट मोलाची होती.
-
सिंगापूरचे संस्थापक अध्यक्ष ली कुआन यू यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थिती.
-
जर्मनीच्या दौऱ्यात जर्मन कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यास आमंत्रित करणे हाच महत्त्वाचा मुद्दा होता. हॅनोव्हर येथे त्यांनी जर्मन उद्योजकांबरोबर चर्चा केली.
-
या दौऱ्यात दोन्ही देशांत १.६ अब्ज डॉलरचे करार करण्यात आले. त्यात संरक्षण, अवकाश आणि हवाई उद्योग, अणुसहकार्य, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान असा क्षेत्रांतील सहकार्याचा समावेश आहे.
-
या दौऱ्यात फ्रेंच कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यास आमंत्रित करणे, संरक्षणसामग्री तसेच नागरी अणुसहकार्य (जैतापूर प्रकल्प) या विषयांवर भर देण्यात आला. फ्रान्सकडून भारतीय हवाई दलासाठी रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार नव्याने, थेट सरकारी पातळीवर करण्यात आला.
-
अंतराळ, व्यापार, कृषी, उद्योग, पर्यावरण, तंत्रज्ञान आदी विषयांत सहकार्याचे तब्बल २२ अब्ज डॉलरचे २६ करार या भेटीत झाले. भारताने चिनी पर्यटकांना इलेक्ट्रॉनिक व्हिसा देण्याचा प्रस्ताव ठेवला. कर्नाटक-सिचुआन, औरंगाबाद-डुनहुआंग, चेन्नई-चाँगकिंग, हैदराबाद-क्िंवगदाओ ही शहरे (व प्रांतात) ‘सिस्टर सिटी’ मानून सहकार्याचे करार झाले. मात्र दोन्ही देशांतील सीमावाद व अन्य वादाच्या मुद्दय़ांवर चर्चा पुढे सरकू शकली नाही.
-
मोदींनी या भेटीत मंगोलियाला १ अब्ज डॉलरची मदत घोषित केली. मंगोलिया एक अणुइंधन पुरवठादार देश आहे. भारताने त्याच्याबरोबर युरेनियम खरेदीचा करार केला आहे. पण तेथून भारताला अद्याप युरेनियम मिळालेले नाही. ती प्रक्रिया मार्गी लावणे हे या भेटीचे एक मुख्य उद्दिष्ट होते.
-
मोदींच्या या भेटीत भारताच्या आर्थिक विकासप्रक्रियेत दक्षिण कोरियाचे योगदान वाढवण्यावर भर होता.
-
वर्षभर परदेश दौ-यासाठी चर्चेत असणा-या मोदींना वर्षपूर्ती होत असताना समाजमाध्यमांवरून टीकेचे धनी व्हावे लागले. चीन दौऱ्यात त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीने जगात भारतीयांची मान उंचावल्याचे सांगताना, यापूर्वी तुम्हाला भारतीय असल्याची लाज वाटत होती असे वक्तव्य तेथील भारतीय समुदायापुढे केले होते. त्यामुळे काँग्रेसने मोदींवर टीका करत परराष्ट्र भूमीवरून राजकीय भाषणबाजी करू नका अशी टीका केली. यापूर्वी मोदींनी परदेशी दौऱ्यावेळी पूर्वीच्या सरकारवर टीका केली होती. त्यामुळे मोदींच्या परदेशवारीबरोबर भाषणावरून मोदी समर्थक-विरोधकांमध्ये समाजमाध्यमांत जुंपली.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…