-
जर्मन कार कंपनी ऑडीने अलिकडेच एक वजनाने हलकी पण तेवढीच मजबूत अशी अल्ट्रालाइट सायकल बाजारात आणली आहे. विशेष म्हणजे ह्या सायकलचं वजन हे फक्त ५.८ किलोग्राम आहे.
-
या सायकलची किंमत होंडा सिटी कारपेक्षाही जास्त म्हणजे जवळपास १२.५ लाख रूपये आहे.
-
या सायकलच्या फ्रेमचे वजन केवळ ७९० ग्राम आहे, जे पाच ते सहा आयफोनच्या एकत्रित वजनाइतके भरते. एका आयफोनचे वजन हे साधारणपणे १७२ ग्राम असते. संपूर्ण सायकल ५.८ किलोग्राम वजनाची आहे.
-
कंपनीने या सायकलसाठी कार्बन फाइबर मटेरियलचा वापर केला आहे. यामुळेच ही सायकल खूप हलकी आणि मजबूत आहे.
-
हि स्पोर्ट्स रेसिंग सायकल सध्या कंपनी केवळ ऑन डिमांडवरच बनवत आहे. त्यामुळे सध्या फक्त ५० सायकलींचीच निर्मिती केली जाणार आहे.
-
सर्वप्रथम ही सायकल जपानच्या बाजाराता विकली जाणार आहे. आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार पहिले उत्पादन ऑक्टोबर महिन्यात बाजारात येईल.
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…