-
टाळ्यांचा अव्याहत कडकडाट आणि शिटय़ांचा दणदणाट.. असेच वातावरण शनिवारी रवींद्र नाटय़मंदिरातील पु. ल. देशपांडे अकादमी मिनी थिएटरमध्ये होते. निमित्त होते ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या संगीतबारीच्या प्रयोगाचे! (छाया- दिलीप कागडा)
-
रसिकांच्या तुफान प्रतिसादामुळे उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी ‘लोकसत्ता’च्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. (छाया- दिलीप कागडा)
-
प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिरमधील पु. ल. देशपांडे अकादमी मिनी थिएटरमध्ये ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाअंतर्गत संगीतबारीचा प्रयोग सादर झाला. (छाया- दिलीप कागडा)
-
‘संगीतबारी’च्या या पहिल्या प्रयोगात संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार विजेत्या शकुंतलाबाई नगरकर, मोहनाबाई महाळंग्रेकर, प्रियांका कला केंद्र (सातारा)येथील गीता लाखे-वाईकर, पुष्पा सातारकर आणि ‘आर्यभूषण थिएटर’ (पुणे)चे चंद्रकांत लाखे (पायपेटी), सुनील जावळे (तबला), सुमीत कुडाळकर (ढोलकी) यांनी ‘संगीतबारी’चा दणका उडवून दिला.
-
कलावंतांच्या नृत्य अदाकारीने बहरलेल्या या कार्यक्रमाला रसिकांच्या शिटय़ा आणि टाळ्यांनी रंगत आणली. (छाया- दिलीप कागडा)
-
महाराष्ट्रात आज सुमारे ४५ संगीतबारी कलाकेंद्रे आहेत. येथे अनेक पाटर्य़ा आपली लावणी कला सादर करत असतात. (छाया- दिलीप कागडा)
-
‘संगीतबारी’ म्हणजे काय याची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती झाली असून ही आगळीवेगळी ‘संगीतबारी’ शहरी प्रेक्षकांसमोर येण्यासाठी ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. (छाया- दिलीप कागडा)
-
कलावंतांनी सादर केलेल्या लावणीला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. (छाया- दिलीप कागडा)
-
कार्यक्रमाचे लेखन भूषण कोरगावकर यांचे तर दिग्दर्शन सावित्री मेधातूल यांचे होते. (छाया- दिलीप कागडा)
-
तमाशा व संगीतबारीतील कलाकारांना एक चांगले व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. (छाया दिलीप कागडा)
-
‘संगीतबारी’ हा कलाप्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला. (छाया – दिलीप कागडा)
-
‘संगीतबारी’च्या निमित्ताने तरुण पिढीपर्यंत हा कलाप्रकार पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. (छाया- दिलीप कागडा)
-
(छाया- दिलीप कागडा)
-
(छाया- दिलीप कागडा)
-
(छाया- दिलीप कागडा)
-
निर्माते अजित भुरे यांच्या ‘ट्रस्ट द थेस्पियन’तर्फे हा कार्यक्रम झाला. (छाया- दिलीप कागडा)
IND vs AUS, Match Timings: भारत- ऑस्ट्रेलिया वनडे सामना किती वाजता सुरू होणार?