-
देशातील सर्वात उंच धबधब्यांमध्ये दुसऱया स्थानी असलेला हा कर्नाटकमधील जोग धबधबा. धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांना न्याहाळता यावे यासाठी कर्नाटक पर्यटन विकास मंडळाने धबधब्यासमोरील टेकडीवर पोहण्यासाठी पायऱयांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
-
तमिळनाडूच्या तिरुलेनवेली जिल्ह्यामध्ये कोर्तल्लम शहरातील हा धबधबा सुप्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, धबधब्याजवळ भगवान शंकराचे मंदिर आहे. भाविकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळते.
-
गोवा-कर्नाटक सीमेवर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु असलेला हा निसर्गसुंदर दुधसागर धबधबा. जंगलाने वेढलेल्या धबधब्याचे पाणी उंचावरून खाली पडत असताना जणू दूध कोसळत असल्याचा भास होत असल्याने या धबधब्याला दुधाचा समुद्र म्हणजे दुधसागर असे म्हटले जाते.
-
केरळमधील अथिराप्पिल्ली धबधबा याची ओळख भारतातील नायगरा धबधबा अशी केली जाते.
-
पर्यटकांचे आकर्षण ठरणारा मनालीपासून १६ किमी अंतरावर असणारा राहाला हा सुंदर धबधबा.
-
आंध्रप्रदेशच्या चित्तुर जिल्ह्यातील नीराबैलू गावात असलेला हा मनमोहक धबधबा.
-
कर्नाटकमधील शिवनासमुद्र धबधब्याला भेट देण्यासाठी मान्सूनचा काळ सर्वोत्तम मानला जातो. याकाळात या धबधब्याचे सौंदर्य पूर्णपणे अनुभवता येते. बंगळुरूपासून हा धबधबा १३५ किमी अंतरावर आहे.
-
महाराष्ट्रातील साताऱयापासून २० किमी अंतरावर असलेला हा धबधबा पश्चिम घाटातील प्रसिद्ध धबधबा आहे. मान्सूनच्या आगमनानंतर ठोसेघर धबधब्याचे खरे सौंदर्य अनुभवता येते. मान्सूनकाळात संपूर्ण महाराष्ट्रातून ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जमते.
-
नम्रदा नदीवर भेडाघाट येथे असलेला हा धुआंधार धबधबा १० मी. उंचीचा असून धबधब्याच्या प्रवाहाचा आवाज अगदी लांबपर्यंत ऐकू येतो.
-
मेघालयमधील या धबधब्याच्या मुख्य उगमस्थानाच्या डाव्याबाजूस हत्तीच्या आकाराचा भव्य दगड होता. त्यामुळे धबधब्यालाही एलिफंट हे नाव पडले. परंतु, १८९७ च्या भूकंपात हा दगड नष्ट झाला.
-
आंध्रपदेशातील नागार्जुन सागर डॅमपासून ११ किमी अंतरावर असणारा हा मनमोहक एथिपोथल धबधबा.
-
छत्तीसगडच्या इंद्रावतीमध्ये जगदलपूरजवळ असलेला चित्रकूट धबधबा. या मनमोहक धबधब्याची उंची 29 मीटर आहे. धबधब्याचे आकार लक्षात घेता याची तुलना नायगरा धबधब्याशी केली जाते.
-
खंडधार धबधबा, ओडिसा
-
हुंद्रू धबधबा, झारखंड
-
थलाय्यर धबधबा, तमिळनाडू
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज