-
योगदिनानिमित्ताने आपण कुठला दिवस साजरा करीत नाही तर मनाला प्रशिक्षण देत आहोत, शांतता व सुसंवादाचे नवे पर्व यामुळे सुरू झाले आहे. प्रगतीसाठी प्रत्येकाने योगाचा वापर करायला हवा. मात्र त्याचा व्यावसायिक हेतूने उपयोग केला जाऊ नये. – नरेंद्र मोदी (छाया-पीटीआय)
-
रामदेवबाबा यांच्याबरोबर मोदी प्रथम मंचावर उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल नजीब जंग, परदेशी दूतावासांचे अधिकारी उपस्थित होते.(छाया-पीटीआय)
-
सुमारे दोन तास चाललेल्या योग अभ्यासात २१ योगमुद्रांचा सराव करण्यात आला. (छाया-पीटीआय)
-
देशभरातही सर्वच राज्ये सकाळपासून योगमय झाली. योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेकडो शाळकरी मुलांसमवेत आणि हजारो साधकांच्या साक्षीने राजपथावर योगसाधना केली. (छाया-पीटीआय)
-
राजपथावरील या भव्य योग सोहळ्याचे दोन विक्रम गिनेस बुकमध्ये नोंदविण्यात आले आहेत. (छाया-पीटीआय)
-
ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका या प्रमुख राष्ट्रांसमवेत आशिया, आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रांमध्ये उत्स्फूर्तपणे योगदिवस साजरा करण्यात आला. (छाया-पीटीआय)
-
भारताकडून १५२ परदेशी दूतांना बोलावण्यात आले होते. जगभरात १९१ देशांतील २५१ शहरात योग दिन साजरा करण्यात आला. (छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
भारतात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत दोन विक्रमांची गिनेस बुकात नोंद झाली. (छाया-पीटीआय)
-
मोदी यांनी राजपथावर वज्रासन व पद्मासने करून स्वतच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा परिचय दिला.(छाया-पीटीआय)
-
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगात शांतता व सुसंवादाच्या नव्या पर्वाची पहाट झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपथावरील योग दिन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर सांगितले. (छाया-पीटीआय)
-
मोदी यांनी तिरंगी पटका व पांढरा पोशाख परिधान केला होता, साधकांना इंग्रजी व हिंदूीतून सूचना दिल्या जात होत्या व आसने मोठय़ा पडद्यावर दाखवली जात होती. (छाया-पीटीआय)
-
मोदी यांनी योग दिनाच्या कल्पनेला पाठिंबा दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले. (छाया-पीटीआय)
-
योग दिनाचा प्रस्ताव गेल्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडला होता. (छाया-पीटीआय)
-
आसने हे योगाचे एक मोठे चित्र आहे, पण त्यात संगीताचा जसा ताल-सूर असतो त्याचेही भान असते, असे मोदी म्हणाले. (छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
भारतात उगम पावलेल्या योगविज्ञानाची गाथा ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’निमित्ताने रविवारी जगभरामध्ये उलगडली आणि सर्वच खंडांमधील नागरिक आसनमग्न झाले. (छाया-पीटीआय)
-
योग दिनाचा कार्यक्रम हा राजकारणाचा भाग नव्हता, तर लोकांच्या कल्याणाचा त्यांच्या फायद्याचा भाग होता, असे मोदी यांनी सांगितले. (छाया-पीटीआय)
-
मुस्लीम गटांनी सूर्यनमस्कार धर्माच्या विरोधात असल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. (छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
राजपथावरील योगसाधनेत एकाचवेळी ३५९८५ लोकांनी सहभाग घेतला. (छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
एकाचवेळी एका ठिकाणी एवढय़ा लोकांनी योगसाधना कधीच केलेली नाही. राजपथावरील योगोत्सवात एकूण ८४ देशांचे नागरिक सहभागी झाले, हा दुसरा विक्रम नोंदला गेला. (छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे उपाध्यक्ष मॅक्रो फ्रिगाटी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात ही घोषणा केली. (छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
-
(छाया-पीटीआय)
नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”