-
सशक्त आशय, प्रसिध्द कलाकार आणि सर्जनशील दिग्दर्शक असे भक्कम ‘पॅकेज’ घेऊन ‘बायोस्कोप’ हा सिनेमा येत आहे.
-
चार वेगवेगळ्या कविंच्या कविता निवडून त्यांच्या चार कथांचा ‘बायोस्कोप’ येथे साकारण्यात आला आहे.
-
संदीप खरेच्या कवितेवर रवी जाधवने ‘मित्रा’ हा लघुपट साकारला आहे.
-
या लघुपटाला राष्ट्रीय पुरसकार मिळाला असून त्याचे सुमारे १५ नामांकित आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये सादरीकरण झाले आहे.
-
मित्रा मध्ये वीणा जामकर आणि मृण्मयी देशपांडे
-
सौमित्र यांच्या कवितेवर ‘एक होता काऊ’ हा लघुपट विजू मानेने दिग्दर्शित केला आहे.
-
एक होता काऊ मध्ये स्पृहा जोशी आणि कुशाल बद्रीके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
असे म्हणतात दोन मराठी माणसं एकत्र कधीच काम करू शकत नाहीत. मात्र हे ज्याने कोणी म्हणून ठेवले आहे, त्याच्या मताला छेद देणारी कामगिरी या चार सर्जनशील दिग्दर्शकांनी बायोस्कोप चित्रपटातून करून दाखविली आहे.
-
मिर्झा गालिब यांच्या गझलवर गजेंद्र अहिरेने ‘दिल-ए-नादान’ हा लघुपट साकारला आहे.
-
दिग्दर्शक अहिरे म्हणाले की, ”पहिल्यांदाच मराठीतील चार दिग्दर्शक एकत्र येऊन काम करत असल्याने हा प्रयोग आमच्यासाठीही तेवढाच उत्सुकता वाढविणारा होता. हा संपूर्ण अनुभव ङ्गार सुखद होता. ”
-
‘दिल-ए-नादान’मध्ये नीना कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत
-
विदर्भातील प्रसिध्द कवी लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर गिरीश मोहितेने ‘बैल’ नावाचा लघुपट बनविला आहे.
-
‘बैल’मध्ये मंगेश देसाई, स्मिता तांबे, सागर करंडे, उदय सबनीस
-
चार दिग्दर्शक, चार कवितांवरील वेगवेगळ्या चार गोष्टी, चार कवी, चार संगीतकार अशा चौकोनी भिंगाच्या चौकटीतून सादर होणारा ‘बायोस्कोप’ १७ जुलै रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली