
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी रविवारी तेंलगणातील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराला भेट दिली. (छायाः पीटीआय) 
यंदाच्या हंगामातला जबरदस्त फॉर्म कायम राखत लुईस हॅमिल्टनने ब्रिटिश ग्रां. प्रि. शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. या शर्यतीचे हॅमिल्टनचे हे सलग दुसरे जेतेपद आहे. (छायाः पीटीआय) 
अहमदाबाद येथील शाळेत मल्लखांबाचा सराव करताना शाळकरी मुले. (छायाः पीटीआय) 
बंगळुरु येथे रविवारी झालेल्या चौथ्या साउथ एशियन बास्केटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाचा पराभव केल्यानंतर आनंद साजरा करताना भारतीय बास्केटबॉल संघ. (छायाः पीटीआय) 
अश्निविनी पोनप्पा कॅनडा ग्रां.प्रि. स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई करणारी बॅडमिंटनपटू अश्निविनी पोनप्पाने रविवारी दादर येथे एका दुकानात आपल्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. (छायाः केविन डिसुझा) 
पावणे एमआयडीसीतील सोनी कंपनीला रविवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागली. (छायाः नरेंद्र वास्कर) 
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने तरुणांना उद्योगांसाठी टेंपोचे वाटप उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी काळाचौकी येथे करण्यात आले. 
डोळे, नाक आणि पाय सोडून बाकीचे शरीर पांढ-या रंगाचे असलेली शेकरु खार राज्यात महाबळेश्वरमध्ये प्रथमच दिसली आहे. याशिवाय याच परिसरात संपूर्ण शरीर पांढरे आणि गुलाबीसर डोळे असलेल्या शेकरुचीही नोंद करण्यात आली आहे. मे महिन्यात राज्यभर केल्या गेलेल्या प्राण्यांच्या गणनेच्या अहवाल समोर आला असून या प्रगणनेनुसार राज्यात अंदाजे ३३०० शेकरु आहेत. 
उन्हात रंगीबेरंगी फुगे विकून थकल्यानंतर दिल्लीतील एका बागेमध्ये विश्रांती घेताना फुगेवाला. (छायाः पीटीआय) -
इगतपुरीजवळ सोमवारी सकाळी ७:३० वाजता मालगाडी घसरल्यामुळे नाशिककडे जाणारी संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल