
जुलै महिना हा खरे तर मुसळधार पावसाचा महिना. मात्र यंदा हा महिना कोरडाठाक जाण्याची चिन्हे आहेत. पाऊस कधी पडेल याची नागरिकांकडून चातकासारखी वाट पाहिली जाते. पण त्याचा काही पत्ता नाही. सोमवारी ठाणे शहरात ढगाळ वातावरण होते, त्यामुळे पावसाची रिमझिम सुरू होईल, अशी आशा ठाणेकरांना लागली. पण केवळ ढग जमले, पाऊस मात्र बेपत्ताचा होता. (छाया : गणेश जाधव) 
आजपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी सिंहस्थ महाकुंभ मेळा सुरु होत आहे. त्यासाठी जगभरातून भाविक येत आहेत. मेळ्याच्या पूर्वसंध्येला भाविकांनी शंखनाद केला. या मेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून २ हजार ५०० कोटी रुपये खर्च करणार आहेत. 
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या विजेत्यांसाठी खास मेजवानीचे आयोजन करण्यात येते. लंडनमधील गिल्डहॉल येथे आयोजित ‘विम्बल्डन चॅम्पियन डिनर’प्रसंगी विम्बल्डन एकेरीचे विजेते नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांनी आपल्या नृत्यनैपुण्याने उपस्थितांचे मने जिंकली. कोर्टवर अफलातून पदलालित्यासह जेतेपदावर नाव कोरणाऱ्या या विजेत्यांचे नृत्यकौशल्य त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची प्रचीती देणारे होते. (छायाः पीटीआय) 
सलमानचे वडिल सलीम खान, भाजप नेत्या शायना एनसी, दिग्दर्शक सुभाष घई आणि पंकजा मुंडे मुंबईत झालेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. (छायाः पीटीआय) 
ब्रिटनचे राजपुत्र विल्यम्स यांनी ईस्ट अॅगलिअन एअर अॅम्बुलन्समध्ये सह-वैमानिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. (छायाः पीटीआय)
PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…”