-
राज्यावरचे अवर्षणाचे संकट दूर कर, राज्यातला शेतकरी सुखी होऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, असे साकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंगाला घातले.

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. 
यावेळी राघोजी नारायणराव धांडे व त्यांच्या पत्नी संगिता यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत शासकीय महापुजेचा मान मिळाला. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळालेले रघोजी धांडे, संगीता धांडे. 
यावेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे हेदेखील उपस्थित होते. -
डोक्यातील निगेटिव्ह विचारांमुळे रात्री झोपच लागत नाही? फक्त ५ उपाय; शांत लागेल झोप