-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी येथे आगमन झाले. यावेळी अबुधाबीचे राजे शेख महंमद बिन झायेद अल नहयान यांनी त्यांचे स्वागत केले. (छाया- पीटीआय)
-
यावेळी शेख महंमद बिन झायेद अल नहयान यांनी मोदींना आलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले. (छाया- पीटीआय)
-
-
'शेख झाएद ग्रँड मॉस्क' या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठय़ा मशिदीला मोदी यांनी यावेळी भेट दिली. (छाया- पीटीआय)
-
संगमरवरी कलाकृती असलेली ही जगातील सर्वात मोठी मशीद समजली जाते. या वेळी मोदी म्हणाले की, या संस्मरणीय ठिकाणाला भेट दिल्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. मशिदीवरील नक्षीकाम आणि कलाकृती कोणालाही भुरळ पाडणारी आहे. जगातील सर्वात नमुनेदार नक्षीकामाचे उदाहरण या कलाकृती सामावलेले आहे. मानवी कलेचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. ही मशीद म्हणजे शांतता आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे. (छाया- पीटीआय)
३४ वर्षांनंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आले आहेत. (छाया- पीटीआय) -
मोदी तब्बल ४० मिनिटे या परिसरात होते. या कालावधीत त्यांनी मशिदीतील कलाकुसरीचे बारकाईने निरीक्षण केले. (छाया- पीटीआय)
-
-
-
नरेंद्र मोदींच्या युएई दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते आज संयुक्त अरब अमिरातीच्या राजांशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील. (छाया- पीटीआय)
-
संयुक्त अरब अमिरातीचे शिक्षण मंत्री शेख हमदान बिन मुबारक यांच्याबरोबर सेल्फी काढताना नरेंद्र मोदी. (छाया- पीटीआय)
-
नरेंद्र मोदी ५० हजार भारतीयांशी संवाद साधणार आहेत. (छाया- पीटीआय)
-
नरेंद्र मोदींनी सोमवारी यूएईमधील मसदार शहराला भेट दिली.
झिरो कार्बन स्मार्ट सिटी असा लौकिक असणारे मसदार शहर संयुक्त अरब अमिरातीमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. यावेळी मोदींनी सुमारे तासभर मसदार शहराचा फेरफटका मारला. यावेळी येथील अधिकाऱ्यांनी मोदींना शहराच्या विविध वैशिष्ट्यांविषयी माहिती पुरविली. यावेळी मोदींनी चालकविरहीत वाहनातून प्रवास केला. (छाया- पीटीआय) -
नरेंद्र मोदींनी सोमवारी यूएईमधील मसदार शहराला भेट दिली.
मसदारच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांविषयी माहिती घेताना नरेंद्र मोदी. (छाया- पीटीआय) मोदींनी मसदारमधील मायक्रो-नॅनो फॅब्रिकेशन आणि मायक्रोस्कोपी प्रयोगशाळेला भेट दिली. (छाया- पीटीआय) -
-
-

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”