-
सेलिब्रिटींकडे स्वतःची खासगी व्हॅनिटी व्हॅन असणे आता तशी पाहता खूप सामान्य गोष्ट झाली आहे. पण बॉलीवूड बादशाहा शाहरुखच्या व्हॅनिटी पाहण्याची संधी कशी दवडून चालेल.
-
एका महागड्या व्हॅनिटी व्हॅनचा मालक आहे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख. तब्बल चार कोटी किंमतीची ही शाहरुखची खास व्हॅनिटी व्हॅन दिलीप छाबडिया यांनी डिझाईन केली आहे.
-
शाहरुखच्या या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनची किंमत चार कोटी रुपये इतकी आहे. शुटिंगदरम्यान शाहरुख या व्हॅनिटी व्हॅनचा उपयोग करतो. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुखसुविधा उपलब्ध आहेत.

ही व्हॅन तयार करण्यासाठी ४५ ते ६० दिवस लागले. भारतातील सर्वात उत्तम अशी व्हॅनिटी असल्याचे डीसीच्या सूत्रांनी सांगितले. -
या व्हॅनचा तळभाग हा काचेचा असून वरच्या भागासाठी लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. यात विशेष मेक-अप चेअर, कपडे ठेवण्यासाठी वॉरड्रॉब, पॅन्ट्री, शय्यागृह, शॉवर अशा सुविधा आहेत.

केवळ आय पॅडवरून किंग खान या सुविधा नियंत्रित करु शकेल, अशी सुविधाही यात करण्यात आली आहे. 
शाहरुखची याआधीची व्हॅनिटी व्हॅन दिलीप छाबडियाच्या डीसी या कंपनीअंतर्गत तयार करण्यात आली होती.
वेगवान’ वंदे भारत एक्स्प्रेसचा सहा तास विलंबाने प्रवास; ऐन दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल…