लहानग्याच्या रेखाचित्रांना वडिलांनी दिले आकर्षक रंगरुप! लहान मुलं मोठी होत असताना त्यांच्या आसपासच्या गोष्टींचे त्यांच्या कुवतीप्रमाणे निरीक्षण करत असतात. कागद, पेन्सिल आणि रंग हातात आल्यावर त्यांच्या कल्पना शक्तीला भरारी मिळते आणि कोऱ्या कागदावर उमटू लागतात रेघोट्या. जसजशी त्यांच्या आकलन शक्तीत वाढ होऊ लागते तसतसे या रेघोट्यांचे रुपांतर बालसुलभ रेखाचित्रांमध्ये होऊ लागते. टॉम कर्टिसच्या सहा वर्षीय मुलानेदेखील अशीच काही रेखाचित्रे आपल्या आकलनशक्तीप्रमाणे साकारली. मुलाने रेखाटलेली ही चित्रे वया न जाऊन देण्याचा निश्चय करून टॉमने संगणकावरील फोटो एडिट टुल्सचा वापर करत त्या रेखाचित्रांना वास्तवातील दुनियेत बसविण्याचा प्रयत्न केला. संगणकाच्या माध्यमातून साकारलेल्या या आकर्षक आणि मोहक रेखाचित्रांचा अनुभव नक्कीच नेत्रसुखद असा आहे. लहान मुलं त्यांच्या कुवतीप्रमाणे आजूबाजूचे वास्तव चित्रात उतरवत असल्याने त्यांच्या चित्रकलेला प्रोत्साहन द्यावे असे त्याचे मानणे आहे. लहान मुलांनी रेखाटलेली चित्रे अतिशय सुंदर आणि क्वचित प्रसंगी विनोदीदेखील असू शकतात हे दर्शविणे ही यामागची माझी कल्पना होती आणि मी याची सुरुवात माझ्या मुलाच्या चित्रकलेपासून केली, असे तो सांगतो. 'हाफिंग्टन पोस्ट-यूके'ला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. प्रत्यक्ष जीवनात अथवा सृष्टीत ही चित्रे कशी दिसतील हे दर्शविण्याचा प्रयत्न नव्हता, तर लहान मुलांचे विश्व संमजून घेण्याचा उद्देश होता, असे देखील तो म्हणाला. (Source: Instagram/ Things I Have Drawn) -
(Source: Instagram/ Things I Have Drawn)
-

Ajit Pawar on Parth Pawar: “मुलं सज्ञान झाल्यावर…”, अजित पवार यांनी पार्थ पवारच्या जमीन खरेदी प्रकरणावर दिली पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्र्यांबाबत म्हणाले…