-
शिमला येथे नुकतीच बर्फ पडण्यास सुरुवात झाली असून याठिकाणचे तापमान उणेमध्ये गेले आहे. मोठ्या प्रमाणात थंडी असली तरी येथील दृश्य नयनमनोहारी दिसत आहेत. (छायासौजन्य – पीटीआय)
हे छायाचित्र पाहून ते परदेशातील आहे असे आपल्याला वाटेल. मात्र भारतातही इतके सुंदर दृश्य असू शकते हे आपल्याला या छायाचित्रातून समजू शकते. (छायासौजन्य – एएनआय) -
उत्तराखंड येथील गंगोत्रीच्या मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला असून मंहिराच्या पायऱ्यांपर्यंत हा बर्फ आल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांनी या काळात दर्शनाला येणे टाळावे असे म्हटले जाते. (छायासौजन्य – पीटीआय)
-
शिमला येथे सतत बर्फ पडत असल्याने येथील रस्ते पूर्णपणे बर्फमय झाले आहेत. त्यामुळे येथील दैनंदिन जीवन काही प्रमाणात शिथिल थंडावले असून दुकानेही बंद असल्याचे दिसत आहे. (छायासौजन्य – एएनआय)
-
शिमला हा पहाडी प्रदेश असल्याने याठिकाणी डोंगरांवर मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. त्यामुळे एरवी झाडांमुळे हिरवे दिसणारे डोंगर या काळात पांढरे शुभ्र दिसायला लागतात. त्यात त्यावर सूर्यप्रकाश पडल्यास हे सौंदर्य आणखीनच खुलते. (छायासौजन्य – एएनआय)
-
बर्फ पडल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत होत असले तरीही येथील नागरीकांना या ऋतूची सवय असल्याने त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु राहतात. मात्र बर्फापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी थंडीचे कपडे घालून येथील लोक स्वत:ची जास्तीत जास्त काळजी घेतात. (छायासौजन्य – पीटीआय)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग