-
जगातील सर्वात उंच पुरुष आणि सर्वात बुटकी महिला यांची नुकतीच भेट झाली. विशेष म्हणजे या दोघांचे मिळून इजिप्तमध्ये फोटोशूट करण्यात आले.
-
तुर्कीमधील सुलतान कोसेन हा सध्या जगातील सर्वात उंच पुरुष म्हणून ओळखला जातो. त्याची उंची ८ फूट ९ इंच इतकी आहे. तर ज्योती आमगे ही नागपूरची महिला जगातील सर्वात बुटकी महिला म्हणून ओळखली जाते.
-
आमगे यांनी सर्वात कमी उंची असल्याने गिनिज बुक रेकॉर्ड केले आहे. आमगे या २५ वर्षांच्या असून कोसेन हे ३६ वर्षांचे आहेत. आता ही दोघे एकत्र फोटोशूट का करत आहेत याबाबत तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल.
-
या दोघांनाही इजिप्तियन टुरिझम प्रमोशन बोर्डकडून फोटोशूट करण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्यांच्या फोटोमध्ये दिसणाऱ्या इजिप्तमधील निसर्गसौंदर्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल असे येथील पर्यटन विभागाचे म्हणणे आहे.
-
सोशल मीडियावर त्यांचे इजिप्तमधील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ट्विटरवर अनेकांनी हे फोटो ट्विट, रिट्विट केले असू न अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. याशिवाय फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
सात दिवसानंतर फक्त पैसाच पैसा, शनी-बुधाचा नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती देणार, नोकरी-व्यवसायात नुसता धनलाभ होणार