-
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथे रामनवमीनिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान मंदिराच्या आवारात साईबाबांच्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत.
-
पुण्याच्या साई आर्टसच्या कलाकारांनी या रांगोळ्या रेखाटल्या असून त्यातील रंगसंगतीही उत्तम झाली आहे.
-
केवळ काळ्या आणि पांढऱ्या रांगोळीचा वापर करत रेखाटलेला साईबाबांच्या आयुष्यातील प्रसंग खूपच नेमका झाला आहे. यातील व्यक्तिरेखा आणि इतर गोष्टी हुबेहुब रेखाटल्या आहेत.
-
रामनवमीनिमित्त मंदिराची केलेली सजावट लक्षवेधी ठरत आहे, यानिमित्ताने कलेचा अविष्कार सादर झाला आहे.
-
साईभक्त साईबाबांच्या दर्शनाबरोबरच पुण्याच्या कलाकारांनी केलेल्या या कलाकृती पाहण्यासाठीही मोठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे.
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?