-
नवसाला पावणारा अशी ओळख असणारा जी.एस. बी गणपती मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपतींपैकी एक म्हणून ओळखला जातो. पाहा येथील गणपतीची सजावट आणि फोटो… (सर्व छायाचित्र दिलीप कागडा)
-
१९५५ साली जी. एस. बी समाजातील माधव पुराणिक यांनी या गणेशोत्सवास सुरूवात केली. त्याकाळी लहान स्वरूपात सुरू झालेली ही गणेशपूजा आज भव्य दिव्य झाली आहे.आजही मुंबईत जी.एस.बी समाजातील व्यक्ती एकत्र येऊन गणेशपूजा करतात.
-
जी.एस. बी मंडळ हे सार्वजनिक गणेशमंडळ असले तरीही या गणेशमूर्तीची स्थापना केवळ ५ दिवसांसाठी किंग सर्कल येथील जी.एस. बी स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर केली जाते.
-
जी. एस. बी गणपतीसाठी खास दिखाव्याची किंवा थीमची रोषणाई केली जात नाही. हे मंडळ केवळ धार्मिक परंपरेनुसार नियमित पूजा करते.
-
जी.एस.बी मंडळाची ओळख सगळ्यात श्रीमंत गणपती अशी होते. कारण या गणेशमूर्तीवर ७० किलो सोनं आणि ३५० किलो चांदीचा वापर करून आभूषण आणि सजावट केली जाते.
-
जी.एस.बी मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक किंग सर्कल येथून सुरू होते
-
ही मिरवणूक सुमारे १२ तासांची असते.
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस