-
रंगाने पांढरा शुभ्र पण चवीला थोडासा कडवट असलेला मुळा या भाजीकडे आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही पाहिलं जातं. मुळा हे एक प्रकारचं कंदमुळ आहे. विशेष म्हणजे बाराही महिने उपलब्ध होणारा मुळा हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. हृदयाशी संबधीत आजारामध्ये किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊयात मुळा खाण्याचे फायदे –
-
पचनक्रिया व्यवस्थित नसणाऱ्या व्यक्तींनी कच्च्या मुळ्याचे सेवन करावे.
-
मुळा खाण्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहतं.
-
मूळव्याध कमी करण्यातही मुळा फायदेशीर आहे.
-
मुळ्यात असलेल्या क; जीवनसत्त्व, फॉस्फरस, जस्त (झिंक) व बी-कॉम्प्लेक्समुळे त्वचाविकार दूर होतात.
-
मूत्राशयासंबंधी समस्या उद्भवल्यास मुळा नैसर्गिक औषधाचे काम करतो.
-
मुळा खाल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
-
मुळ्यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो.
-
कावीळ झाल्यास जेवणात मुळ्याचा समावेश करावा.

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…