-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच १२ मे रोजी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मात्र मोदी पुन्हा एकदा आठ वाजता बोलणार म्हटल्यावर सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी याआधीही अनेकदा रात्री आठच्या भाषणांमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय जाहीर केले आहेत. त्यामुळेच आजही मोदी काही मोठी घोषणा करणार का याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलं आहे. मात्र मोदी आठ वाजताच का घोषणा करतात किंवा आठ आकडा हा मोदींचा प्रिय आकडा आहे का यासंदर्भात इंटरनेटवर अनेकदा लोकं सर्च करताना दिसतात. याबद्दलच आपण या फोटोगॅलरीमधून प्रकाश टाकणार आहोत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ वाजता केलेले सर्वात ऐतिहासिक संबोधन म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ चे भाषण. काळ्या पैशावर अंकुश आणण्यासाठी मोदी सरकारने सर्व ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय ८ तारखेला रात्री आठ वाजता जाहीर केला. अवघ्या चार तासांमध्ये या नोटा चलनातून हद्दपार होणार असल्याचे मोदींनी सांगितलं होतं.
-
५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हद्दपार करुन जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतरही तीन दिवसांनी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी ८ वाजता मोदींनी याच विषयावर देशाला संबोधित करत या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रदेशाचा विकास होईल असं म्हटलं होतं. ३७० संदर्भात निर्णय घेण्यात आलेला महिना म्हणजेच ऑगस्ट हा ही वर्षातील आठवा महिना आहे हे ही विशेषच.
-
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानांचे दिल्लीतील सरकारी निवासस्थान असणाऱ्या सेव्हन रेस कोर्सचे नाव २०१६ साली बदलून सेव्हन लोक कल्याण मार्ग असं ठेवलं होतं. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार न्यमुरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्राच्या हिशोबानुसार 'लोक कल्याण मार्ग'ची बेरीज आठ येते तर रेस कोर्सची बेरीज सहा येते, असं 'द विक'ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
-
वेगवेगळ्या वेबसाईट्सवरील अनेक बातम्या, क्वोरासारख्या प्लॅटफॉर्मवरील चर्चा आणि काही अंकशास्त्राच्या तज्ज्ञांनुसार मोदी आठ क्रमांकाला प्राधान्य देतात. त्यांची जन्माची तारीख १७ सप्टेंबर १९५० आहे. त्यापैकी १ आणि ७ ची बेरीज आठ होते.
-
मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ २६ मे २०१४ रोजी घेतली होती. येथेही २ आणि ६ ची बेरीज ८ होते असं अंकशास्त्रातील तज्ज्ञ सांगतात.
-
सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांच्या आतच मोदींनी स्वालंबन अभियान या गरिबांसाठीच्या योजनेची सुरुवात १७ सप्टेंबर २०१४ रोजी केली. (१+७ = ८)
-
मोदींनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच सार्क या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग नोंदवला तो २०१४ साली. या परिषदेचे उद्घाटन मोदींच्याच हस्ते झाले होते ती तारीख होती २६ नोव्हेंबर २०१४ (२+६ = ८)
-
२०१५ सालीच पंतप्रधान मोदींनी डिजीटल इंडिया हा त्यांच्या महत्वकांशी योजनाचा श्रीगणेशा केला. ही योजना २६ सप्टेंबर २०१५ रोजी अंमलात आणण्यात आली. (२+६ = ८)
-
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवातही मोदी सरकारने ८ एप्रिल २०१५ रोजी केली.
-
करोनासंदर्भात देशाला संबोधित करतानाही मोदींनी २४ मार्च २०२० ला रात्री आठचाच वेळ निवडला होता. याच संबोधनामध्ये त्यांनी देशामध्ये २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS