-
मोठी शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे याशिवाय चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषा आणि बळकावलेल्या अक्साई चीन भागात जवळपास ५० हजार सैनिक तैनात केले आहेत.
-
यातून फक्त शस्त्रास्त्रच नव्हे, तर युद्ध रणनितीपासून ते अमलबजावणीपर्यंत रशियाचा चीनवर असणारा प्रभाव दिसून येतो, असे इंडियन एअर फोर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (फोटो सौजन्य – एपी)
-
चीनने उद्या आक्रमण केलेच तर तोफाखाना आणि रॉकेटसचा मारा सुरु करतील, त्यामध्ये त्यांची पायदळाची तुकडी पुढची चाल करेल. युद्ध लढण्याचा हा जुना सोव्हिएत मार्ग आहे असे अधिकाऱ्याने सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
-
युद्धाच्या प्रसंगात चीनला जे हवाई सुरक्षा कवच अपेक्षित आहे, तो 'होतान' एअर बेस पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ३२० किलोमीटर अंतरावर आहे.
-
स्ट्रॅटजिक एक्सपर्ट्सनुसार, भविष्यात कुठल्याही युद्धात स्टँण्ड ऑफ वेपन म्हणजे दूर अंतरावरुन मारा करता येणारे मिसाइल्स, बॉम्बचा वापर होईल.
-
चीनने अशा पद्धतीने युद्ध लढले तर भारताकडेही त्याचे उत्तर आहे. यावेळी इंडियन एअर फोर्सची भूमिका खूप निर्णायक ठरेल.
-
चीनची योजना धुळीस मिळवण्यासाठी IAF कडे सुद्धा प्रत्युत्तर देण्याची रणनिती तयार आहे. विविध युद्ध अभ्यासात त्याचा सरावही करण्यात आला आहे.
-
चीनने कुठलीही आक्रमकता दाखवल्यास IAF कडून तात्काळ जोरदार प्रत्युत्तर मिळेल. पीएलएच्या एअर फोर्सपेक्षा इंडियन एअर फोर्सची कृती जलद असेल, कारण LAC पासून होतान, ल्हासा आणि काशगर हे बेस लांब आहेत.
-
भारताच्या फायटर जेटसमधील हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र चीनचा एअर डिफेन्स मोडून काढतील. एकदा का एअर डिफेन्स सिस्टिमची ताकत संपली की, मग तोपखान, रॉकेट सिस्टिमला सहज लक्ष्य करता येऊ शकते.
-
अतिआक्रमकता दाखवणाऱ्या चीनला गलवान खोऱ्यात त्यानंतर पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारतीय सैन्याने आपली ताकत दाखवून दिली आहे.

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?