-
ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी म्हटले आहे की त्यांना “खात्री” आहे की, एआयमुळे ग्राहक सेवा नोकऱ्यांना सर्वांत पहिल्यांदा फटका बसणार आहे. (Photo: Reuters)
-
द टकर कार्लसन शोमध्ये बोलताना ऑल्टमन म्हणाले, “मला खात्री आहे की, सध्या फोन किंवा संगणकावरून ग्राहकांना जी मदत दिली जाते, त्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांना एआयमुळे आपली नोकरी सर्वात पहिल्यांदा गमवावी लागेल आणि ते काम एआयद्वारे अधिक चांगल्या प्रकारे केले जाईल.” (Photo: Reuters)
-
ऑल्टमन यांनी असेही म्हटले की, नोकरी गमावणाऱ्यांमध्ये पुढचा क्रमांक प्रोग्रामर्सचा असू शकतो. त्यांनी असेही नमूद केले की नोकरीतील बदल नेहमीपेक्षा खूप वेगाने होऊ शकतो. (Photo: Reuters)
-
एआयमध्ये आणखी प्रगती झाल्यास, ग्राहक सेवा / सपोर्ट एजंट (फोन किंवा संगणक-आधारित) आणि प्रोग्रामर / सॉफ्टवेअर अभियंते (नियमित कोडिंग करणारे) त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात, असे ऑल्टमन यांनी नमूद केले. (Photo: Reuters)
-
याउलट, ऑल्टमन यांनी काही अशा नोकऱ्यांचा उल्लेख केला ज्या सहजासहजी जाणार नाहीत. त्यामध्ये मानवी सहानुभूती लागणाऱ्या सेवा जसे की नर्सिंग आणि आरोग्य सेवा पुरवणारे यांच्या समावेश आहे. एआयमुळे अशा नोकऱ्या सहजासहजी जाणार नाहीत, कारण त्यात माणसांची भावनिक समज, सहवेदना आणि वास्तविक संवाद आवश्यक असतो. (Photo: Reuters)
-
ऑल्टमन यांनी, त्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केले की, ग्राहक सेवेत अनेकदा त्याच सेवा पुन्हा पुन्हा द्याव्या लागतात आणि ठराविक स्क्रिप्टनुसार चालतात, ज्या एआय अधिक कार्यक्षमतेने करू शकते. (Photo: Reuters)
-
त्यांनी असेही नमूद केले की जरी अनेकांना “जर तुम्ही चांगले असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल” असे वाटत असले तरी, बदलाचे प्रमाण आणि वेग मागील नोकरीच्या बदलांपेक्षा खूप जास्त असू शकतो. (Photo: Reuters)
-
ऑल्टमन यांनी पुढे असेही म्हटले की, प्रोग्रामिंगमधील सर्वच नोकऱ्या जाणार नाहीत. पण, ज्या प्रोग्रामिंगमधील कामे ठराविक स्वरूपाची आहेत, किंवा ज्यामध्ये सर्जनशीलता किंवा निर्णयक्षमतेची गरज कमी आहे, अशा नोकऱ्यांमध्ये घट होऊ शकते. (Photo: AFP)
-
विद्यार्थी, नोकरदार आणि शिक्षण धोरणकर्त्यांसाठी यातून स्पष्ट धडा असा आहे की, एआय सहजपणे करू शकणार नाही अशा क्षेत्रांमध्ये कारकिर्द घडवा. जेणेकरून नोकरीच्या बाजारपेठेत बदल होत असताना तुम्ही तुमची नोकरी गमावणार नाही. (Photo: Reuters)

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”