-
लडाखमधील शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते आणि ‘३ इडियट्स’ या हिट बॉलीवूड चित्रपटामागील प्रेरणास्थान असलेल्या सोनम वांगचुक यांना लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार धरून अटक करण्यात आली आहे.
-
सोनम वांगचुक यांच्या स्वयंसेवी संस्थांच्या खात्यांमध्ये अनेक कथित आर्थिक अनियमितता आढळल्यानंतर तपास यंत्रणा त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याचबरोबर त्यांच्या संस्थांवर परदेशी निधी स्वीकारण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
-
याव्यतिरिक्त, केंद्र सरकारला असा संशय आहे की, त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि चिथावणीखोर विधानांमुळे लडाखमध्ये हिंसाचार झाला असावा, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला.
-
सप्टेंबर २०२५ मध्ये, त्यांनी लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि आदिवासी समुदायांसाठी वाढीव स्वायत्तता व सुरक्षा मागण्यासाठी उपोषण सुरू केले होते. त्यांचे हे उपोषण शांततापूर्ण मार्गाने होते तरी, आंदोलनादरम्यान लेहमध्ये हिंसक संघर्ष उसळला, ज्यामुळे जीवितहानी झाली.
-
१९६६ मध्ये लडाखमधील उलेतोकपो येथे जन्मलेल्या सोनम वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणा आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये मोठे काम केले आहे.
-
सोनम वांगचुक यांचे लग्न हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाखच्या सह-संस्थापक गीतांजली अंगमो यांच्याशी झाले आहे.
-
१९८८ मध्ये स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखचे संस्थापक म्हणून सोनम वांगचुक यांनी पारंपारिक शिक्षण प्रणालींना आव्हान दिले आहे, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि स्वतंत्र विचारसरणीला प्रोत्साहन दिले आहे.
-
सोनम वांगचुक यांच्या या योगदानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे, ज्यामध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराचाही समावेश आहे.
-
सोनम वांगचुक यांचा मोठा सामाजिक प्रभावा असूनही, अहवालांनुसार त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ७५ लाख रुपये इतकीच आहे. यातील बहुतांश उत्पन्न त्यांना त्यांच्या लोकप्रिय YouTube चॅनेल @wangchuksworld मधून मिळते. त्यांच्या चॅनचे १.७ दशलक्षाहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. (All Photos: @Wangchuk66/X)

IND vs SL: याला म्हणतात कॅप्टन! सूर्यादादाने सामना सुरू असताना खेळाडूंना पाहा काय सांगितलं होतं? विजयानंतर झाला खुलासा