-
तुम्ही तुमच्या बँकेतील खात्याला नॉमिनी व्यक्ती जोडला आहे का? याचे नेमके काय फायदे तोटे होतात तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया..
-
आजच्या डिजिटल युगात, बँक खाते असणे ही केवळ आवश्यकता नाही, तर ती एक गरज बनली आहे. पगारापासून ते सरकारी सब्सिडीपर्यंत सर्व काही तुमच्या खात्यातूनच दिले जाते.
-
पण जर खातेधारकाचा अचानक मृत्यू झाला तर खात्यातील शिल्लक कोणाला मिळेल? तर याचे उत्तर आहे नॉमिनीला मिळेल.
-
नॉमिनी म्हणजे अशी व्यक्ती असेते जिला तुम्ही बँकेत लेखी अधिकार देता की तो तुमच्या अनुपस्थितित खात्यातून पैसे काढू घेऊ शकतो.
-
आरबीआय आणि बँकांनी आता नॉमिनीची माहिती देणे जवळजवळ अनिवार्य केले आहे. कुटुंबाला लांबलचक कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागत नाही.
-
तुमच्या जवळची कोणतीही व्यक्ती नॉमिनी असू शकते, जसे की जोडीदार, मुले, पालक किंवा भावंडे. यामुळे पैसे योग्य व्यक्तीपर्यंत सहज पोहोचणार की नाही याची काळजी उरत नाही..
-
नॉमिनी म्हणून तुमचे नाव असेल तर क्लेम करणे सोपे होते. तुम्हाला फक्त मृत्यू प्रमाणपत्र आणि ओळखपत्र द्यावे लागेल आणि बँक थेट बँक बॅलन्स ट्रान्सफर करेल.
-
जर नॉमिनी रजिस्टर केलेला नसेल तर प्रकरण गुंतागुंतीचे होते आणि पैसे मिळविण्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट आणि कोर्ट प्रोसेस करावी लागते.
-
बँक खाते उघडताना नॉमिनी देणे महत्त्वाचे आहे कारण हे छोटेसे पाऊल तुमच्या कुटुंबाला कायदेशीर आणि आर्थिक अडचणींपासून वाचवू शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाकारल्याने व्हाईट हाऊसचा संताप; म्हणाले, “त्यांनी राजकारणाला…”