-
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असून, ते १ लाख २९ हजारांपर्यंत पोहोचले आहे.
-
सोने, सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक असून, तो प्रामुख्याने दागिन्यांमध्ये वापरला जातो. भारतात, लोक सोन्याच्या दागिन्यांना एक शुभ वस्तू मानतात जे संपत्ती, आनंद, समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहे.
-
धनतेरस असो किंवा बंगाली नववर्ष असो, लोक सोन्याच्या दागिन्यांच्या वस्तू, नाणी आणि इतर अनेक वस्तू खरेदी करतात कारण ते सोन्याच्या धातूला अमूल्य आणि सर्वात मौल्यवान मानतात.
-
१८८५ मध्ये, घर बांधण्यासाठी लागणाऱ्या दगडांसाठी खान खोदत असताना, ऑस्ट्रेलियन खाण कामगार जॉर्ज हॅरिसन यांना जोहान्सबर्गजवळ सोने सापडले, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या शोधाची सुरुवात झाली.
-
एका औंस वजनाचा सोन्याचा नग सापडणे हे पाच कॅरेटच्या हिऱ्याच्या तुलनेत अधिक दुर्मिळ आहे.
-
मानवी शरीराचे तापमान ३७ अंश सेंटीग्रेड असते. सोन्याची उष्णता चालकता म्हणजेच ते शरीराच्या तापमानापर्यंत पोहोचण्याचा वेग जास्त असल्याने दागिन्यांसाठी त्याचे मूल्य वाढण्याचे एक कारण आहे.
-
मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे १८७,२०० टन सोन्याचे उत्खनन करण्यात आले आहे.
-
आज उत्खनन केलेल्या सोन्यापैकी ४९ टक्के सोन्याचे दागिने बनवले जातात.
-
कॅलिफोर्निया गोल्ड रशपासून जगातील ९० टक्क्यांहून अधिक सोन्याचे उत्खनन करण्यात आले आहे.
-
आतापर्यंतचे सर्वात मोठे सोन्याचे नाणे २०१२ मध्ये पर्थ मिंटने बनवले होते. त्याचे वजन एक टन आणि व्यास ८० सेमी होता. (All Photos: gold.org)

रशियन तेल खरेदी थांबवण्याबाबत मोदींनी शब्द दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; केंद्र सरकार म्हणाले, “भारत कायम…”