पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या खासगी जीवनामुळे चर्चेत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. तेव्हापासून हार्दिक चर्चेला विषय आहे. हार्दिकनंच्या स्टइलवर नेटकरी नेहमीच फिदा असतात. सोशल मीडियावर नेहमीच त्याच्या स्टाइलची चर्चा होत असते. हार्दिकला महागड्या वस्तू वापरण्याचा शॉक असल्याचे अनेकदा समोर आले आहे. बऱ्याचवेळा हार्दिक महागडे शूज, सनग्लासेस, स्नीकर आणि जॅकेटमध्ये दिसतो. हल्ली एअरपोर्टवर पुन्हा एकदा हार्दिकचा असा लूक दिसून आला. त्यानं घालेल्या महागड्या वस्तूची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हार्दिक पांड्यानं मध्यंतरी सर्जरीनंतर रूग्णलयातून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये त्याच्या हातात असलेल्या घडाळाची किंमत टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ८० लाख रूपये आहे. तसेच नुकताच एअरपोर्टवरील लूकमध्ये हार्दिकनं घातलेल्या घड्याळाची किंमत तब्बल एक कोटी रूपये आहे. हार्दिकनं पाटेक फिलिपची पर्पेचुअल कॅलेंडर 5740/1G हे घड्याळ घातलं होतं. याची साधारण किंमत ८५ लाख आहे. भारतात हे घड्याळ मिळत नसल्यामुळे त्याची किंमत एक कोटी १० लाख आहे. हार्दिक पांड्याने परिधान केलेल्या बुटाची किंमत एक लाख रूपयापर्यंत असेल असा अंदाज काही वेबसाईटनं व्यक्त केला आहे. हार्दिकच्या पायात क्रिसचियन लुबाउटिनचे लु स्पाइक्स शूज असतात. ब्लॅक काफफिश लेदरच्या या बूटाची किंमत विदेशात ७० हजार आहे. भारतात हा बूट आयात केला जातो त्यामुळे त्याची किंमत एक लाखापर्यंत असेल. हार्दिक पांड्याला हिरे खूप आवडतात. विश्वचषक होण्यापूर्वी त्याने खास डायमंड बॅट आणि बॉल लॉकेट बनवले होते. हार्दिक पांड्याकडे लँबोर्गिनी हुरकॅनही गाडी आहे. या गाडीची भारतात किंमत ३.५८ कोटी रूपये आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार विराट आणि धोनीपेक्षाही महागडी गाडी हार्दिक पांड्याकडे आहे.

१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ