-
भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय मिळवला. भारतीय विजयाची सात कारणे… (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
भारताची भेदक गोलंदाजी – न्यूझीलंडने पहिली फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली होती. पहिल्या विकेटसाठी मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो यांनी ८० धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर शिवम दुबेने आठव्या षटकात गप्टीलला ३० धावांवर बाद करुन न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
त्यानंतर केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी प्रत्येकी अर्धशतक मारुन न्यूझीलंडचा डाव सावरला. मात्र अंतिम षटकात भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना २०३ पेक्षा अधिक धावा करता आल्या नाही. या धावा त्यांना भारताच्या आक्रमक फलंदाजांसमोर कमी पडल्या परिणामी भारतीय संघ जिंकला. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
भारताचे क्षेत्ररक्षण – ताज्या दमाच्या खेळाडूंमुळे गेल्या काही काळात भारताचे क्षेत्ररक्षण कमालीचे सुधारले आहे. आणि याची प्रचिती या सामन्यात देखील आली. या सामन्यात न्यूझीलंडचे पाचही फलंदाज झेल बाद झाले. भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडला सहजगत्या एक- दोन धावा घेऊ दिल्या नाहीत. दरम्यान काही ओव्हर थ्रो झाले. मात्र न्यूझीलंडच्या तुलनेत भारताचे क्षेत्ररक्षण चांगले होते. परिणामी त्यांना मोठ्या फटक्यांवर जास्त लक्ष द्यावे लागले. आणि मोठे फटके मारण्याच्या नादात न्यूझीलंडचे फलंदाज झेल बाद झाले. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
विराट कोहली आणि लोकेश राहूलची धमाकेदार फलंदाजी – भारताला २०४ धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा केवळ सात धावांवर बाद झाला. त्यानंतर लोकेश राहूल आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी अर्धशतक झळकावून भारताला विजयाच्या जवळ नेले. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
न्यूझीलंडची खराब गोलंदाजी – रोहित शर्मा स्वतात बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी काही काळ चांगली गोलंदाजी केली. परंतु विराट आणि राहूल यांनी सावधगिरीने फलंदाजी करायला सुरुवात केल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांची लय बिघडली. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी षटकार आणि चौकारांची बरसात करुन न्यूझीलंडला विजयापासून आणखी दूर नेले. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
न्यूझीलंडचे खराब क्षेत्ररक्षण – न्यूझीलंडने भारतासमोर २०४ धावांचे आव्हान उभे करुन देखील त्यांना सामना गमवावा लागला. कारण त्यांचे खराब क्षेत्ररक्षण. न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी विराट आणि राहूलच्या प्रत्येकी दोन कॅच ड्रॉप केल्या. त्यानंतर विराटला धावबाद करण्याची सुवर्ण संधी देखील गमावली. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
तसेच त्यांचे पूर्ण लक्ष चौकार आणि षटकार रोखण्याकडे होते. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सहजगत्या एकेरी आणि दुहेरी धावा चोरता आल्या. परिणामी याचा दबाव न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वाढत गेला. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
श्रेयस अय्यर – श्रेयस अय्यरला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. विराट कोहली, के. राहूल आणि शिवम दुबे बाद झाल्यानंतर सामना पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या दिशेने झुकू लागला होता. परंतु त्याचवेळी श्रेयस अय्यरने काही आक्रमक फटके खेळून सामना पुन्हा एकदा भारताच्या दिशेने वळवला. त्याने ३ षटकार आणि ५ चौकार मारुन २९ चेंडूत ५८ धावा केल्या.
-
भारताचा विजयी क्षण – श्रेयस अय्यर आणि मनिश पांडे (फोटो सौजन्य ट्विटर)
-
कॉलिन मुनरो – कॉलिन मुनरोने ४२ चेंडूत ५९ धावा केल्या. मुनरो १२ व्या षटकात शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो सेट झालेला फलंदाज होता. त्याच्या हाताता आणखी आठ षटके होती.
-
या अनुशंगाने विचार करता जर शार्दूलच्या गोलंदाजीवर त्याने थोडे धैर्याने फलंदाजी केली असती. तर नंतरच्या अंतीम षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांमोर त्याला आणखी धावा करता आल्या असत्या. परिणामी न्यूझीलंडची धावसंख्या आणखी वाढून २३५ च्या आसपास गेली असती. आणि भारतासमोर आणखी मोठे आव्हान उभे राहिले असते.
-
मार्टीन गप्टील बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी अशा प्रकारे आनंद साजरा केला. (फोटो सौजन्य ट्विटर)

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत