-
लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यानंतर प्रत्येक राज्यात परप्रांतीय मजूर आपल्या घराकडे जाण्यासाठी गर्दी करत आहेत. अशा लोकांसाठी भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग पुढे सरसावला आहे.
-
विरेंद्र सेहवागने आपल्या संस्थेच्या माध्यमातून दररोज १०० लोकांच्या जेवणाची सोय करण्याची जबाबदारी घेतली आहे. मजुरांसाठी आपल्या घरात जेवणाचे डबे तयार करताना सेहवाग (सर्व फोटो सौजन्य – विरेंद्र सेहवाग सोशल मीडिया अकाऊंट)
-
महत्वाची गोष्ट म्हणजे सेहवागचा सर्व परिवार या कामात सहभागी झालेला आहे.
-
ज्यांना या कामात आपला हातभार लावण्याची इच्छा आहे त्यांनी पुढे येण्याचं आवाहन सेहवागने केलं आहे.
-
सेहवागचा मुलगाही या कामात हिरारीने सहभागी झाला आहे.
-
घरी जाणाऱ्या मजुरांना सेहवागच्या संस्थेमार्फत हे जेवणाचे डबे पुरवले जात आहेत.
-
स्वतःच्या हाताने तयार केलेलं अन्न डब्यात भरुन इतरांना देणं आणि सध्या ज्यांना याची सर्वात जास्त गरज आहे अशा लोकांना ते खाताना पाहणं यासारखं सुख नसल्याचं सेहवागने म्हटलं आहे.

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी