-
संपूर्ण देश सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतो आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका देशातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे.
-
प्रतीकात्मक छायाचित्र
-
प्रतिकात्मक छायाचित्र
-
Asian Youth Meet मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलेला मिराज अली आपल्या सहा जणांच्या कुटुंबासोबत दिल्लीत एका भाड्याच्या घरात राहतोय. किडनीचं ऑपरेशन होऊनही घर चालवण्यासाठी मिराजचे वडील काम करत आहेत. पण घर चालवायचं तर इतका पैसा पुरत नाही. त्यामुळे नाईलाजाने का होईना मिराजही सध्या पडेल ते काम करतोय. खेळ आणि सराव करायला मिळेल हा विचार आता त्याने सोडून दिलाय. दूध घेणं परवडत नसल्यामुळे मिराजच्या परिवाराने चहा घेणं बंद केलंय. (फोटो – अँड्रू अम्सन)
-
लाँग जंप प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी थबिथा महेश्वरन सध्या घरकामात मदत करतेय. लॉकडाउनमुळे थबिथाला स्पॉन्सर करणाऱ्या NGO ने तिच्या भत्त्यात कपात केली आहे. लॉकडाउनमुळे रिक्षाचालक असलेले तिचे वडील बाहेर पडत नाहीयेत. अशा परिस्थितीत सरावासाठी बाहेर पडणं थबिथाच्या मनातही येत नाही. (फोटो सौजन्य – राहुल पवार)
-
काही खेळाडू आपलं स्वप्न जगण्यासाठी अजुनही मेहनत करत आहेत. दिल्लीचा त्रिलोक कुमार सकाळी रिक्षा चालवून संध्याकाळी सराव करतोय. आपल्या सरावासाठी अधिकाधिक पैसे जमवण्याचा त्रिलोकचा प्रयत्न सुरु आहे. खेळात करिअर करायचं माझं स्वप्न आहे, पण माझ्यासमोर रिक्षा चालवण्याशिवाय आता कोणताही पर्याय नसल्याचं त्रिलोकने सांगितलं. (फोटो – अँड्रू अम्सन)
-
२०१८ साली १० हजार मि. शर्यतीत रौप्यपदक मिळवलेल्या राहुललाही या परिस्थितीचा फटका बसलाय. लहान वयात वडिलांचं छत्र हरवलेला राहुल दिल्लीत एका मिल्क फॅक्टरीत काम करतो. रात्री ११ ते पहाटे ४ काम केल्यानंतर राहुल आपल्या घराचं भाडं सुटेल इतके पैसे कमावतो. लॉकडाउन काळात हे कामही कमी झाल्यामुळे त्याच्यासमोरचं संकट अधिक गडद झालंय. (फोटो – अँड्रू अम्सन)
-
U-14 गटात दिल्लीचा middle-distance champion अलोक कुमार एरवी सरावासाठी जाताना बस सुटणार नाही ना या चिंतेत असतो. परंतू लॉकडाउन काळात याच बसंच भाडंही त्याला परवडत नाहीये. रोजंदारीवर काम करणारे वडील आणि घरकाम करणारी आई यांना साथ देण्यासाठी त्याला घरीच रहावं लागतंय. रोजगार तुटल्यामुळे लॉकडाउन काळात अलोकचा परिवार अनेकदा रात्री गरम पाणी पिऊन झोपून जायचा. (फोटो – अँड्रू अम्सन)
-
Asian Youth Athletics Championships मध्ये २०१९ साली कांस्यपदक मिळवणाऱ्या अली अन्सारीला सध्या घर चालवण्यासाठी रस्त्यावर फळं विकावी लागत आहेत. वडिलांचा रोजगार तुटलाय, घरात येणारा पैसा बंद झाला. मी परिवारातला मोठा मुलगा असल्यामुळे मला त्यांची जबाबदारी घेणं भाग होतं. आता बहुतेक मी केळीवाला बनेन असंच वाटतंय अली अन्सारीने आपली हताश प्रतिक्रीया व्यक्त केली. (फोटो – अँड्रू अम्सन)
-
१५०० मि. शर्यतीत National Youth Champion हरेंद्र कुमार आता उत्तर प्रदेशात आपल्या गावी जाऊन शेतात काम करण्याचा विचार करतोय. या परिस्थितीत दिल्लीत किती दिवस राहू शकेन याबद्दल शाश्वती नसल्याचं हरेंद्रने सांगितलं. शेतात काम करुन आईचे गुडघे दुखतात, फोनवर ती नेहमी सांगत असते, आणि त्यात इथे सरावही करता येत नाहीये. आता मी फारकाळ तग धरु शकेन असं वाटत नाही. आईचा एक फोन आणि मी हे सर्व सोडून घरी परत जाईन… (फोटो – अँड्रू अम्सन)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक