-
गेल्या काही वर्षांपासून वेडिंग फोटोशूट, प्रि-वेडिंग फोटोशूट या संकल्पना चांगल्या फोफावल्या आहेत. या फोटोशूटदरम्यान फोटोग्राफरची कल्पकता आणि हे जोडप्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. बांगलादेशची महिला क्रिकेटपटू संजिदा इस्लामनेही लग्नाच्या भरजरी पोषाखात क्रिकेटची बॅट हातात घेऊन फोटोशूट केलं.
-
तिचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहे. २४ वर्षीय संजिदा इस्लामचं बांगलादेशमधील स्थानिक क्रिकेटपटू मिम मोसादकशी लग्न झालं. यावेळी संजिदाने केलेला साजशृंगार पाहण्यासारखा होता. संजिदाचं हे फोटोशूट एवढं व्हायरल झालं की आयसीसीनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ते शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य – संजिदा इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
संजिदाला क्रिकेटसोबत फिरायलाही खूप आवडतं, तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास आपल्याला याची जाणीव होते.
-
२४ वर्षीय संजिदा बांगलादेशच्या महिला संघात मधल्या फळीत खेळते. आतापर्यंत तिने १६ वन-डे आणि ५४ टी-२० सामन्यांमध्ये बांगलादेशच्या महिला संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
-
२०१२ साली आयर्लंडविरुद्ध सामन्यात संजिदाने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
-
संजिदा जिकडे फिरायला जाते तिकडे आपलं खास फोटोशूट करुन घेत असते
-
क्रिकेटच्या मैदानासोबत सोशल मीडियावरही तिचं चांगलंच फॅन फॉलोइंग आहे.
-
फोटो सौजन्य – संजिदा इन्स्टाग्राम अकाऊंट

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…