-
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये भारताने सात गडी राखून विजय मिळवला. भारतासमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य असताना इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतकं साकारत भारताचा विजय सोप्पा करुन दिला.
-
विराटने नाबाद ७३ धावांची खेळी केली तर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या इशानने ५६ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून ९२ धावांची भागीदारी केल्याने भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. विराटने आपल्या या खेळीमध्ये तीन विक्रम केले.
-
विराट या ७३ धावांच्या मदतीने सर्वात वेगाने १२ हजार धावा पूर्ण करणारा पहिला कर्णधार ठरला आहे. विराटने केवळ २२६ खेळींमध्ये कर्णधार म्हणून १२ हजार धावांचा टप्पा पार केलाय.
-
विराटच्या आधी हा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावे होता. रिकीने २८२ खेळींमध्ये हा विक्रम केला होता.
-
कर्णधार म्हणून १२ हजार धावा करणारा विराट हा पहिला भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम धोनीच्या नावे होता. धोनीने कर्णधार पद भूषवताना ११ हजार २०७ धावा केल्यात.
-
अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये विराटने टी-२० मध्ये तीन हजार धावांचा टप्पाही गाठला. विराट कोहली हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे ज्याने टी-२० मध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार केलाय.
-
टी२० मध्ये सर्वात आधी एक हजार धावा ब्रॅडन मॅकलमने पूर्ण केल्या होत्या. २०१० मध्ये एक हजार धावा पूर्ण करणाऱ्या ब्रॅडनला पुढील एक हजार धावा पूर्ण करायला चार वर्षे लागली. २०१४ मध्ये त्याने दोन हजार धावांचा टप्पा गाठला.
-
विराटने या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलं. हे विराटचं टी-२० मधील २६ वं अर्धशतक आहे. या अर्धशतकासोबतच त्याने २५ अर्धशतकं करणाऱ्या रोहित शर्मालाही मागे सोडलं आहे.
-
विराट कोहलीने विजयाचे श्रेय हे भारतीय गोलंदाजांना दिलं आहे. विराटने वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर आणि हार्दिक पांड्याचं कौतुक केलं आहे.
-
विराटने पदार्पणामध्ये अर्धशतक ठोकणाऱ्या इशानचही कौतुक केलं आहे. इशानच्या खेळीत आक्रामकपणा आपल्याला आवडल्याचे विराटने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: विराट कोहली आणि बीसीसीआयच्या फेसबुक पेजवरुन, ट्विटरवरुन आणि रॉयटर्सवरुन साभार)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली