भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सातत्याने करोना लढ्यात आपले योगदान देत आहे. करोनाग्रस्तांसाठी विविध सुविधा पुरवण्यासोबत तो आता अजून एक कौतुकास्पद काम करताना दिसून आला. सोशल मीडियावर सचिनची काही फोटो व्हायरल झाले. यात तो रक्तदानासाठी असलेल्या वाहनातून बाहेर पडताना दिसून आला. सचिनने घराबाहेर रक्तदान शिबिरात भाग घेतला आणि रक्तदानही केले. करोनाहून बरे झाल्यानंतर सचिन म्हणाला होता, की तो प्लाझ्मा देईल. जागतिक रक्तदाता दिवसाचे निमित्त साधून सचिनने हे रक्तदान केले. आपल्याकडे जीव वाचवण्याची शक्ती आहे. त्यामुळे तिचा वापर करू, असे सचिनने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सचिनने इतरांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सचिन अनेकवेळा सामाजिक प्रश्नांशी संबंधित मुद्यांना हात घालतो. करोना काळातही ते सरकार आणि जनतेला सतत मदत करताना दिसून आला. देशातील करोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान सचिनने एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज नंतर सचिनला करोनाची लागण झाली होती. परंतु करोनातून बरे झाल्यानंतर सचिनने ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर खरेदी करण्याच्या उद्देशाने एक कोटी रुपयांची देणगी दिली होती.

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”