-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाला पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आलं.
-
रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.
-
या पराभवानंतर भारतीय महिला खेळाडू मैदानामध्येच रडू लागल्या.
-
भारतीय संघाची गोलकीपर सविता पुनियाला मैदानातच रडू आलं.
-
सामना संपल्याची शिट्टी वाजताच भारतीय महिला खेळाडू निराश होऊन मैदानातच आहेत त्या जागी बसल्या.
-
अनेकजण मान खाली घालून आपल्या भावानांना वाट मोकळी करुन देत होत्या.
-
काहीजणी हॉकी स्टीकचाच आधार घेऊन ज्या जागी होत्या तिथेच बसल्या.
-
अनेक महिला खेळाडू शुन्यात नजर लावून बसल्या होत्या.
-
गोलकीपर सविता पुनियालाही भावना अनावर झाल्याचं पहायला मिळालं.
-
संपूर्ण स्पर्धेत भन्नाट कामगिरी करणारी सुनिता बराच वेळ गोलपोस्टजवळ रडत होती.
-
सुनिताचे हे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.
-
अखेर सपोर्टींग स्टाफने सुनिताला धीर दिल्याचं पहायला मिळालं.
-
अनेक महिला खेळाडू आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कॅमेरांनी त्यांच्या भावना टीपल्या.
-
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनाही खेळाडूंना धीर दिला.
-
रडणाऱ्या आपल्या शिष्यांना शोर्ड मरिन यांनी मिठी मारत त्यांना धीर दिला.
-
ब्रिटनच्या संघातील महिलांनाही भारतीय खेळाडूंना सावरलं.
-
ब्रिटनच्या महिला खेळाडूंनी भारतीय महिलांना धीर दिला.
-
या सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाने ९ मिनिटात ३ गोल केले.
-
मात्र अंतिम क्वार्टरमध्ये ब्रिटनने केलेला गोल निर्णयाक ठरला आणि चुरशीच्या लढतीत भारत ब्रिटनकडून ४-३ असा पराभूत झाला.
-
उदास चेहऱ्यानेच भारीतय महिला मैदानाबाहेर पडल्या. (फोटो : सोनी लिव्ह आणि ट्विटरवरुन साभार)

सरकारचा मोठा निर्णय! हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वत: मंजुरी, माजी न्या. शिंदेंचा मनोज जरांगेंना शब्द