-
दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या भक्कम इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे.
-
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड
-
दोन्ही संघ सेंच्युरियन, जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे तीन कसोटी सामने खेळणार आहेत. सुपरस्पोर्ट पार्कमध्ये तयारी सुरू करण्यापूर्वी १८ खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये काही दिवस क्वारंटाइन केले जाईल.
-
भारतीय कसोटी संघ गुरुवारी (१६ डिसेंबर) सकाळी मुंबईहून चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आणि काल संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे.
-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यापूर्वी संघाच्या प्रस्थानाचे फोटो शेअर केले होते आणि आता बीसीसीआयच्या सोशल मीडिया हँडलवरून संघाच्या आगमनाचे फोटोही शेअर करण्यात आली आहेत.
-
भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे.
-
विराट कोहली कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेत १८ जणांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. भारताला त्यांचा नवनियुक्त उपकर्णधार रोहित शर्माची उणीव भासेल, जो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
-
दरम्यान, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोन प्रमुख डावखुऱ्या फिरकीपटूंशिवाय भारत कसोटी मालिकेत जाणार आहे. शुबमन गिलही दुखापतग्रस्त असून तो संघाचा भाग नाही.
-
आफ्रिकेत पोहोचल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या फोटोंवर विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. सर्वजण फोनमध्ये घुसलेत, उमेश यादवचा फोल्डेबल फोन काय मस्त वाटतोय, अशा प्रतिक्रिया या फोटोंवर देण्यात आल्या आहेत.
-
या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहली म्हणाला, ”दक्षिण आफ्रिका शेवटचे स्थान आहे, जिथे आम्ही मालिका अद्याप जिंकलेलो नाही.” भारताने दक्षिण आफ्रिकेत २० कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघ फक्त तीन सामने जिंकू शकला आहे.
-
२०१८ च्या शेवटच्या दौऱ्यावर त्यांनी खडतर आव्हान दिले होते, तरीही भारताने १-२ अशा फरकाने मालिका गमावली.
-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ तीन संघ (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका) दक्षिण आफ्रिकेला त्याच्या भूमीवर पराभूत करू शकले आहेत. (सर्व फोटो बीसीसीआय/ट्विटरवरून साभार)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”