-
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी तो सतत चर्चेत असतो.
-
महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी सिंह धोनीची जोडी चाहत्यांमध्ये सतत चर्चेत असते.
-
धोनी आणि साक्षीसाठी आजचा दिवस खास आहे.
-
याचं कारण म्हणजे १४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दोघेही पहिल्यांदा भेटले होते.
-
साक्षी सिंह धोनीने रविवारी तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय.
-
या फोटोसोबत तिने लिहिलंय, एकमेकांना ओळखण्याला १४ वर्ष पूर्ण झाली. चिअर्स. या फोटोत महेंद्रसिंग धोनी सूट-बूटमध्ये दिसत आहे, तर साक्षीनेही ट्रडिशनल कपड्यांमध्ये दिसत आहे.
-
महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी धोनी यांचं लग्न ४ जुलै २०१० रोजी झालं.
-
मात्र त्यापूर्वीपासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते.
-
एमएस धोनीने काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने साक्षीसोबत लग्न केले.
-
या दोघांना एक मुलगी आहे. जिवा धोनीचे मस्ती करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या कुटुंबासह जयपूरमध्ये आहे. तिथे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचे लग्न आहे.
-
एमएस धोनी अलीकडेच त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत विमानतळावर दिसला होता.
-
प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेल आणि साक्षी धोनी खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे साक्षी मुलगी आणि पतीसह या लग्नात उपस्थित राहिली.
-
(सर्व फोटो साक्षी धोनीच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”