-
सनरायझर्स हैदराबादसोबत खेळताना चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडचे शतक हुकले. ऋतुराज गायकवाड ९९ धावांवर झेलबाद झाला.
-
ऋतुराजचे शतक एका रनमुळे हुकल्यामुळे आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणते खेळाडू ९९ धावांवर बाद झाले असतील असे विचारले जातेय. याच निमित्ताने जाणून घेऊन घेऊया की, आयपीएलमध्ये आतापर्यंत किती खेळाडू ९९ धावांवर बाद झाले आहेत.
-
सनरायझर्स हैदराबादसोबत खेळताना सलामीला येत ऋतुराज गायकवाड धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र ९९ धावांवर असताना तो झेलबाद झाला.
-
त्यानंतर २०१३ साली बंगळुरु संघाकडून खेळणारा विराट कोहलीदेखील ९९ धावांवर बाद झाला होता. दिल्लीविरोधात खेळताना विराट दुर्दैवी पद्धतीने बाद झाला होता.
-
पृथ्वी शॉदेखील ९९ धावांवर असताना बाद झाला होता. २०१९ साली कोलकाता नाईट रायडर्सविरोधात खेळताना पृथ्वी शॉ ९९ धावांवर असताना तंबुत परतला होता.
-
२०२० सालीच मुंबई इंडियन्सकडून खेळणारा इशान किशनदेखील ९९ धावांवर बाद झाला होता. रॉयल चॅलेंजर्सविरोधात खेळताना त्याचे शतक हुकले होते.
-
२०२० साली पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या सामन्यात पंजाबकडून खेळणार ख्रिस गेलदेखील ९९ धावांवर बाद झाला होता