
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६६ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अटीतटीची लढत झाली.

या सामन्यात लखनऊचा अवघ्या दोन धावांनी विजय झाला.

या सामन्यात केकेआरचा पराभव झाला असला तरी या संघातील रिंकू सिंह या फलंदाजाचे चांगलेच कौतुक होत आहे.

संघ अडचणीत असताना त्याने धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या १५ चेंडूमध्ये ४० धावा करत लखनऊची चिंता वाढवली होती.

मात्र दोन चेंडूंमध्ये तीन धावांची गरज असताना मार्कस स्टोईनिसने टाकलेल्या चेंडूवर एव्हिन लुईसने त्याचा अफलातून झेल टिपाला. ज्यामुळे रिंकू सिंहला झेलबाद म्हणून जाहीर करण्यात आले.

रिंकू सिंह बाद झाल्यानंतर केकेआरच्या विजयाच्या आशा मावळल्या.

मात्र आता रिंकू सिंहला चुकीच्या पद्धीतीने बाद केल्याचा दावा केकेआरचे चाहते करत आहेत.

मार्कस स्टॉईनिसने नो बॉल टाकला होता. तरीदेखील रिंकू सिंहला बाद ठरवण्यात आलं, असं केकेआरचे चाहते म्हणत आहेत.

स्टॉईनिस गोलंदाजी करतानाचे फोटो टाकून तसा दावा केला जातोय. तसेच पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन रोष व्यक्त केला जातोय. (सर्व फोटो- iplt20.com)