-
टी-२० विश्वचषक आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. २००७ साली या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून स्पर्धेदरम्यान काहीना काही वाद निर्माण झाले आहेत. यापैकी पाच मोठे वाद नेमके कोणते होते जाणून घेऊया.
-
२००७ साली झालेल्या टी-२० विश्वचषकात युवराज सिंग आणि एंड्र्यू फ्लिंटॉप यांच्यात वाद झाला होता. युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात ६ षटकार लगावल्यानंतर चिडलेल्या एंड्र्यू फ्लिंटॉपने युवराजला शिवीगाळ केली होती.
-
२००९ साली ऑस्टेलियन खेळाडू एंड्रयू साइमंड्सला ऑस्ट्रेलियन क्रिकेट व्यवस्थापनाने स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यावेळी ऑस्टेलियन खेळाडूंना मद्यप्राशन करण्यात मनाई करण्यात आली होती. मात्र, साइमंड्ने या नियम उल्लंघन केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. यामुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
-
२०१० साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने विजय मिळवला होता. संपूर्ण स्पर्धेत केविन पीटरसन उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. मात्र, २०१२ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पीटरसनला संघात स्थान देण्यात आले नाही. यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. पीटरसनलासारख्या खेळाडूला संघातून वगळणे ही मोठी गोष्ट होती.
-
२०१६ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता. “मी माझ्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असून मला पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त प्रेम मिळाले.” असे वक्तव्य त्याने केले होते. त्यानंतर शाहिद आफ्रिदीला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले होते.
-
२०२१ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत झालेल्या दक्षिण आफ्रिकेचा खेळाडून क्विंटन डिकॉकने वेस्टइंडिज विरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला होता. यासंदर्भात त्याला विचारले असता, त्याने वयक्तिक कारणाने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर वर्णद्वेषाच्या निषेध म्हणून गुडघ्यावर बसण्यासाठी तो तयार नसल्याचे त्याने हा निर्णय घेतला असल्याचे पुढे आले होते. यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.

शेतकऱ्याचा नाद नाय! तब्बल ५ एकरवर बांधलं जबरदस्त शेततळं; VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की