-
शनिवारी पार पडलेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2024 मध्ये आपला पहिला विजय मिळवला. सामन्यामध्ये गोलंदाज मयंक यादवने आयपीएलसाठी दमदार पदार्पण देखील केले.
-
मयंक यादवच्या जबरदस्त कामगिरीने सामन्यामध्ये निर्णायक भूमिका बजावली सोबतच मयंकने आयपीएल 2024च्या सीजनमध्ये सर्वात वेगवान गोलंदाजाचे विक्रम आपल्या आपल्या नावावर केले.
-
सामन्यात यादवच्या गोलंदाजीमुळे पंजाब किंग्जला आपल्या फलंदाजीच्या क्रमवारीत नुकसान झाले ज्यामुळे मयंक आजपर्यंतच्या हंगामातील सर्वात वेगवान गोलंदाज बनला.
-
मयंक यादवच्या या उत्कृष्ट पदार्पणामुळे तो सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे आणि अनेकांकधून तो प्रशंसा देखील मिळवत आहे.
-
आपला पहिला आयपीएल सामना खेळत असलेल्या मयंकने विरोधी संघाच्या सलामी भागीदारी यशस्वीपणे संपुष्टात आणली आणि जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंग यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत मयंकने 3-27 अशी शानदार खेळी केली.
-
१७ जून २००२ रोजी जन्मलेला मयंक यादव हा दिल्लीचा 21 वर्षीय वेगवान गोलंदाज आहे. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये त्याने पदार्पण केले आहे.
-
मयंक यादव आयपीएल पदार्पणापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे. जिथे वेगवान गोलंदाज म्हणून त्याने सर्व फॉरमॅटमध्ये 51 विकेट्स घेतले आहेत.
-
विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्ली संघासाठी खेळताना मयंकने शेवटच्या दोन षटकात १२ धावांची गरज असताना ४९व्या षटकात मेडन टाकून मॅच आपल्या नावावर केली.
-
मयंक यादवच्या या उत्कृष्ट खेळीमुळे तो नक्कीच भारतीय संघासाठी एक उत्तम गोलंदाज ठरेल.
-
(सर्व फोटो : मयंक यादव/ इन्स्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत