-
२०११ च्या ऐतिहासिक विश्वचषकला आज १३ वर्षे उलटून गेली, पण विश्वचषकच्या विजयाचा क्षण प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात कायम आहे. कर्णधार एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वानखेडे मैदानावर विश्वचषक विजय पटकावला होता.
-
2 एप्रिल 2011 ला भारतीय क्रिकेट संघाने वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवून विश्वचषक विजेतेपद पटकावले. हा भारताचा दुसरा विश्वचषक विजेतेपद होता. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला विश्वचषक विजेतेपद मिळवले होते.
-
अंतिम सामन्यापूर्वी भारत आणि श्रीलंका विश्वचषकाच्या इतिहासात सात वेळा एकमेकांच्या सामोरे आले होते. या स्पर्धेत आशियाई संघांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ होती.
-
या सामन्यामध्ये एम एस धोनी पाचव्या क्रमांकावर येऊन त्याने ७९ चेंडूत ९१ धावांची खेळी केली होती.
-
विश्वचषकाच्या विजयासह एम एस धोनीला मॅन ऑफ द मॅच म्हणून अवॉर्ड मिळाले होते.
-
अंतिम फेरीत भारताला विजयासाठी २७५ धावांची गरज होती. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने भारताचे सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरचे विकेट घेतले. सातव्या षटकात भारताची धावसंख्या ३१/२ अशी होती.
-
या सामन्यामध्ये गौतम गंभीरने भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावली त्याने ९७ धावा केल्या पण थिसारा परेराच्या गोलंदाजीवर त्याचे शतक थोड्यासाठी हुकले.
-
एम एस धोनी शेवटपर्यंत सामन्यामध्ये नाबाद राहिला होता त्याच्या एकूण ९१ धावा झाल्या होत्या, ४९व्या षटकात जबरदस्त षटकार मारून धोनीने भारताला विजय मिळवून दिले होत.
-
२०११ च्या विश्वचषक विजयाचा आनंद संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात चाहत्यांनी साजरा केला होता.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक