-
जुही चावला ही बॉलीवूडच्या अतिशय लाडक्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जुहीने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Juhi/Instagram)
-
नुकतंच जुहीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने शाहरुख खानबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. (Juhi/Instagram)
-
जुही चावलाने शाहरुख खानबरोबर आयपीएल मॅच पाहण्याचा अनुभव आणि त्याच्याबरोबरचे तिचे नाते याबाबत भाष्य केले आहे. (Juhi/Instagram)
-
जुही चावला, तिचे पती जय मेहता आणि शाहरुख खान हे आयपीएल संघ केकेआरचे एकत्रित मालक आहेत. (Juhi/Instagram)
-
अनेकदा शाहरुख केकेआरला पाठिंबा द्यायला अनेकदा स्टेडियमला जातो. अशावेळी जुही सुद्धा शाहरुखबरोबर संघाला पाठिंबा देताना दिसते. (Juhi/Instagram)
-
मात्र, नुकतंच जुहीने असं म्हटलं आहे की शाहरुखबरोबर कोणताही सामना पाहणे कठीण आहे. कारण तो प्रत्येकवेळी जुहीवर त्याचा राग काढताना दिसतो. (KKR/Instagram)
-
एका रिपोर्टनुसार, जुहीने एका कार्यक्रमात म्हटले आहे की शाहरुखबरोबर कोणताही सामना पाहणे योग्य नाही. (KKR/Instagram)
-
जुहीने पुढे म्हटले आहे की, “जेव्हा संघ चांगली कामगिरी करत नाही तेव्हा शाहरुखबरोबर सामना पाहणे अतिशय कठीण असते. तो त्याचा सर्व राग तिच्यावर काढतो.” अशा वेळेस जुही त्याला म्हणते की हे सर्व तिच्याकडे नाही तर संघाला जाऊन सांग. (KKR/Instagram)
-
याच कारणामुळे जुही म्हणते की मॅच पाहण्यासाठी सोबत म्हणून शाहरुखला घेऊन जाणे अजिबात योग्य नाही. (KKR/Instagram)
-
जुहीच्या मते इतर संघ मालकांबरोबरही असे होत असावे. जेव्हा त्यांचा संघ मैदानात उतरला असेल तेव्हा तेही उत्सुकता आणि भीतीने अस्वस्थ होत असतील. (Indian Express)
-
शाहरुख खान आणि जुही चावला यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांच्यात चांगली मैत्री आहे. या मैत्रीमुळेच त्यांनी ‘कोलकाता नाईट रायडर्स’चे एकत्र मालकत्व स्वीकारले. (Juhi/Instagram)
-
२००८ पासून कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल खेळत असून शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या या संघाने आतापर्यंत दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. (Indian Express Bangla)

अवघ्या काही तासात ‘या’ ३ राशींचं बदलेल नशीब, अचानक धनलाभ तर करिअरमध्ये नवी संधी; मंगळाचं गोचर उघडेल श्रीमंतीचं दार