-
बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला नुकत्याच झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात १२ लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
-
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने केकेआरचा दोन विकेट्सच्या फरकाने पराभव केला. जोस बटलरच्या दमदार कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सने या सामन्यात बाजी मारली. जोस बटलर फक्त ६० चेंडूत नाबाद राहून १०७ धावा केल्या.
-
या सामन्यानंतर बीसीसीआयने श्रेयस अय्यरवर दंडाची घोषणा केली.
-
बीसीसीआयच्या नियमांनुसार ‘स्लो ओव्हर रेट’च्या गुन्ह्यांसाठी श्रेयस अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
-
यंदाच्या आयपीएल हंगामात केकेआर संघाचा सहा सामन्यांमधून फक्त दोन वेळा पराभव झाला तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने मात्र शानदार विजयासह सात सामन्यांमधून सहा विजय नोंदवले आहेत.
-
बीसीसीआयकडून आयपीएलमध्ये सर्व संघांना आवश्यक ओव्हर-रेट राखण्यासह आयपीएलच्या नियमांचे पालन करण्यासाठी अनेक नियम करण्यात आले आहे त्या नियमाअंतर्गत श्रेयश अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
-
बीसीसीआयने आयपीएलमध्ये सामन्यांचे सुरळीत आचरण सुनिश्चित करण्यासाठी आणि सामन्यांचे नियोजित वेळेचे पालन करण्यासाठी या नियमांचे अंमलबजावणी केली आहे.
-
हा दंड फक्त मैदानावरील शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि आयपीएलच्या मानकांचे पालन करण्यासाठी आहे तर यामध्ये अयशस्वी झाल्यास त्याचे परिणाम संघ आणि त्या प्रत्येक संघाच्या कर्णधाराला भोगावा लागतो.
(सर्व फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

Bangladesh : भारताने बांगलादेशी वस्तूंवर निर्बंध लादल्यानंतर मोहम्मद युनूस सरकार नरमलं; म्हणाले, “सर्व मुद्द्यांवर…”