-
टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी आहे, तर हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
जाणून घेऊया आगामी टी-२० स्पर्धेसाठी भारताच्या घोषित १५ खेळाडूंच्या कामगिरीबद्दल. (फोटो – बीसीसीआय) -
रोहित शर्माने एकूण १५१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये रोहितने ३१.७९ च्या सरासरीसह १३९.३७ च्या स्ट्राइक रेटने एकूण ३९९४ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषका मध्ये रोहितच्या नावावर ५ शतक आणि २९ अर्धशतक आहेत. (फोटो – रोहित शर्मा इंस्टाग्राम)
-
टी-२० विश्वचषकामध्ये हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हार्दिकने भारतासाठी एकूण ९२ टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २५.४३ च्या सरासरीने त्याने १३४८ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये हार्दिकने ३ अर्धशतके झळकावली आहेत आणि आपल्या गोलंदाजीत त्याने ७३ बळी घेतले आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये हार्दिकची सर्वोत्तम कामगिरी करत १६ धावांत ४ विककेट्स घेतल्या होत्या. (फोटो – इंस्टाग्राम)
-
यशस्वी जैस्वालने भारतासाठी १७ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ३३.४६ च्या सरासरीने त्याने ५०२ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने टी-२० विश्वचषकामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतके झळकावली आहेत. या सामन्यामध्ये त्याने १६१.९३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. (फोटो – यशवी जैस्वाल इंस्टाग्राम)
-
विराट कोहलीने भारतासाठी एकूण ११७ टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये ५१.७५ च्या शानदार सरासरी आणि १३८,१५ स्ट्राइक रेटसह त्याने ४०३७ धावा केल्या आहेत. विराटने टी-२० मध्ये १ शतक आणि ३७ अर्धशतके झळकावली आहेत. (फोटो – विराट कोहली इंस्टाग्राम)
-
सूर्यकुमार यादव हा खेळाडू आपल्या कामगिरीमुळे टी-20 स्पेशालिस्ट मानला जातो त्याने भारतासाठी एकूण ६० सामने खेळले असून ४५.५५ च्या सरासरीने २१४१ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने टी-२० विश्वचषकामध्ये ४ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत. (फोटो – सूर्यकुमार यादव इंस्टाग्राम)
-
अपघातानंतर ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी पुनरागमन करणार आहे आणि यंदाच्या आयपीएलमध्येही तो शानदार कामगिरी करत आहे. यामुळे त्याची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतासाठी त्याने ६६ टी-२० सामन्यांमध्ये २२.४३ च्या सरासरीने त्याने एकूण ९८७ धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर ३ अर्धशतके देखील आहेत. यष्टिरक्षक म्हणून त्याने २७ कॅच पकडून ९ स्टंपिंग रेकॉर्ड केले आहेत. (फोटो – ऋषभ पंत इंस्टाग्राम)
-
भारतीय संघामध्ये दुसरा यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. संजू सॅमसनने भारतासाठी एकूण २५ टी-20 सामन्यांमध्ये १८.७० च्या सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. १३३.०९ स्ट्राइक रेटने संजू सॅमसनच्या नावावर १ अर्धशतक आहे आणि यष्टिरक्षक म्हणून त्याने एकूण १४ कॅच पकडले आहेत ४ स्टंपिंग रेकॉर्ड ही आहे. (फोटो – संजू सॅमसन इंस्टाग्राम)
-
आयपीएलमधील आपल्या शानदार कामगिरीमुळे शिवम दुबेची निवड टी-२० विश्वचषकासाठी करण्यात आली आहे. शिवम दुबेने भारतासाठी एकूण २१ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ३९.४२ च्या सरासरी आणि १४५.२६ च्या स्ट्राइक रेटने त्याने २७६ धावा केल्या आहेत. शिवम दुबेच्या नावावर ३ अर्धशतक देखील आहेत आणि आपले गोलंदाजीतही त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो – शिवम दुबे इंस्टाग्राम)
-
रवींद्र जडेजाने भारतासाठी ६६ सामन्यात ५३ विकेट घेतल्या आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये २१ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-२० विश्वचषकामध्ये जाडेजा ७.१० च्या इकॉनॉमीने खेळतो. जडेजाने आपल्या फलंदाजीत १२५.३२च्या स्ट्राइक रेटसह ४८० धावा केल्या आहेत. (फोटो – रवींद्र जडेजा इंस्टाग्राम)
-
टी-२० विश्वचषकामध्ये गोलंदाज अक्षर पटेलची दुसरा फिरकी अष्टपैलू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने भारतासाठी ५२ सामन्यात ४९ विकेट घेतल्या आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये ९ धावांमध्ये ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-२० विश्वचषकामध्ये अक्षर पटेल ७. २६ च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करतो. आपल्या फलंदाजीत त्याने ३६१ धावा करत एक अर्धशतक देखील झळकावले आहे. (फोटो – अक्षर पटेल इंस्टाग्राम)
-
कुलदीप यादवने भारतासाठी ३५ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५९ विकेट घेतल्या आहेत. टी-२० सामन्यामध्ये १७ धावा ठेवून ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-२० सामन्यामध्ये कुलदीप यादव ६.७४ ची इकॉनॉमीने खेळतो. (फोटो कुलदीप यादव – इंस्टाग्राम)
-
युजवेंद्र चहलने भारतासाठी एकूण ८० सामन्यामध्ये ९६ विकेट घेतल्या आहेत. टी-२० सामन्यामध्ये २५ धावांमध्ये ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. युजवेंद्र चहलने ८.१९ इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. युजवेंद्र चहलला सामन्यामध्ये दोनदा ४ पेक्षा जास्त विकेट घेण्यात यश आले आहे. (फोटो – चहल इंस्टाग्राम)
-
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारतासाठी एकूण ४४ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ६२ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० सामन्यामध्ये अर्शदीप ८.६३ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. सामन्यामध्ये ३७ धावांमध्ये ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. (फोटो – अर्शदीप सिंग इंस्टाग्राम)
-
भारताचा यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणजे जसप्रीत बुमराह, ज्याने भारतासाठी एकूण ६२ सामन्यात ७४ विकेट घेतल्या आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये ११ धावांमध्ये ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुसामन्यामध्ये बुमराह ने ६.५५ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. (फोटो – जसप्रीत बुमराह इंस्टाग्राम)
-
मोहम्मद सिराजने भारताकडून १० सामन्यात १२ विकेट घेतल्या आहेत. सिराजने ८.७९ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये १७ धावांमध्ये ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
(फोटो – मोहम्मद सिराज इंस्टाग्राम)

Horoscope Today: शनी सोनपावलांनी कोणत्या राशींचे नशीब पालटणार? कोणाला स्वीकारावे लागतील नवीन बदल तर कोण घेईल योग्य संधीचा लाभ; वाचा राशिभविष्य